जमिनीच्या पोटात 3000 फूट खोल दरीत असलेलं पृथ्वीवरचं सर्वात डेंजर गाव; इथं जायचं असेल तर दोनच पर्याय

खरं खुरं पाताळ लोक पहायचे असेल तर पृथ्वीवरच्या या गावाला भेट द्या. हे गाव 3 हजार फूट खोल दरीत आहे. 

वनिता कांबळे | Jan 25, 2025, 18:00 PM IST

 Grand Canyon : अधोलोकात लोक कसं जीवन जगत असतील याचा अनुभव घ्यायचा असेल तर पृथ्वीवरील या गावाला नक्की भेट द्या. हे गाव  जमिनीच्या पोटात 3000 फूट खोल दरीत आहे. काळ खूप झपाट्याने बदलत आहे. मात्र येथील लोक आजही जुन्या पद्धतीने आपले जीवन जगत आहेत. जगापासून दूर हे लोक पृथ्वीच्या तीन हजार फूट खाली राहत आहेत.

1/7

 अनेक गावं ही डोंगरावर वसलेली असतात. तर काही डोंगर कपारीत असतात. पृथ्वीवर एक असं गाव आहे जे  जमिनीच्या पोटात 3000 फूट खोल वसलेल आहे.   

2/7

या गावात पोहचण्यासाठी वाहतुकीची साधने काहीच नाहीत. रस्ते नसल्यामुळे हे गाव जगापासून अलिप्त आहे. या गावात जाण्यासाठी खेचरांचा वापर करतात. येथे फिरायला येणारे लोक हेलिकॉप्टरने येतात.

3/7

खोल दरीत असलेल्या या गावात घरापासून शाळेपर्यंत, याशिवाय तुम्हाला चर्च, पोस्ट ऑफिस, जनरल स्टोअर अश सर्व सुविधा आहेत. इथं एक कॅफे देखील आहे.  

4/7

 दरवर्षी सुमारे 55 लाख लोक या ठिकाणी भेट देतात. येथे राहणाऱ्या लोकांना रेड इंडियन म्हणतात.

5/7

 200 लोकसंख्या असलेले अमेरिकन गाव जगभरातील पर्यटकांसाठी प्रसिद्ध आहे.  

6/7

हे अनोखे गाव म्हणजे अमेरिकेच्या ग्रँड कॅनियनच्या हवासू कॅनियनची सुपाई.पृथ्वीवरचं हे अनोखे गाव खोल दरीत वसलेले आहे. 

7/7

जमिनीच्या पोटात 3000 फूट खोल असलेलं हे गाव पृथ्वीवरचं सर्वात डेंजर गाव म्हणून ओळखले जाते. या गावात जाणारा देखील तितकाच भयानक आहे.