2 तासांचा सर्वात मोठा फ्लॉप चित्रपट, 45 कोटी बजेट अन् कमाई 60 हजार, OTT वरही मिळाले नाही स्थान

सतत एक नाही तर एक प्रदर्शित होत असल्याचे आपण पाहतो. ज्यात काही ब्लॉकबस्टर होतात तर काही चित्रपट हे फ्लॉप ठरतात. काही चित्रपट तर असे असतात जे ओपनिंग डेच्या दिवशी देखील थिएटर खाली असतात. अशात आज अशा एका चित्रपटाविषयी जाणून घेणार आहोत. जो बनवण्यासाठी कोट्यावधी रुपये खर्च केले पण कमाईच्या बाबतीत त्यानं काहीच कमावले नाही. 

Diksha Patil | Jan 25, 2025, 17:59 PM IST
1/7

काही चित्रपट असे असतात जे कमी बजेटमध्ये बनवले तरी हिट होतात. त्याशिवाय ते रेकॉर्ड ब्रेक कमाई देखील करतात. तर काही चित्रपट हे बिग बजेट असले तरी चांगली कमाई करत नाहीत. त्यात असा एक चित्रपट आहे, ज्यानं फक्त काही हजार रुपयांचा गल्ला केला होता. 

2/7

इतकंच नाही तर त्याचे 300 तिकिटं सुद्धा विकली गेली नाहीत. या चित्रपटाला ओटीटी प्लॅटफॉर्मनं देखील रिजेक्ट केलं होतं त्यानंतर अखेर हा चित्रपट Youtube वर प्रदर्शित झाला. हा चित्रपट आहे अर्जुन कपूर आणि भूमि पेडनेकर यांचा 'द लेडी किलर'. 

3/7

या चित्रपटाला प्रेक्षकांकडून इतका चांगला प्रतिसाद मिळाला की त्याला आतापर्यंतचा तो सगळ्यात फ्लॉप म्हटला जात होता. हा चित्रपट 2023 मध्ये प्रदर्शित झाला.  

4/7

'द लेडी किलर' ला बनवण्यासाठी 45 कोटी रुपये खर्च केले. तर या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर 60 हजारांचं कलेक्शन केलं. ओपनिंग डेला या चित्रपटाची 300 तिकिटं देखील विकली गेली नाही. 

5/7

या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला तेव्हा कोणालाही काही कळलं नाही आणि त्यानंतर हा चित्रपट पाहण्यासाठी खूप कमी लोकं पोहोचले होते. या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर असा प्रतिसाद मिळाला की हा चित्रपट ओटीटीवर घेण्यासाठी कोणी तयार झालं नाही. त्यामुळे हा चित्रपट ओटीटीवर देखील पाहायला मिळणार नाही. 

6/7

त्यामुळे या चित्रपटाचं डिजीटल स्ट्रीमिंग देखील नाही मिळालं. निर्मात्यांनी चित्रपटाला टी-सीरिजच्या युट्यूबवर प्रदर्शित केलं. या चित्रपटामुळे निर्मात्यांना खूप नुकसान झालं.

7/7

काही प्रेक्षकांनी युट्यूबवर या चित्रपटाला पसंती दर्शवली. या चित्रपटाला पाहिल्यानंतर अर्जुन कपूरनं अनेक फ्लॉप चित्रपट दिले. पण या चित्रपटात कलाकारांनी चांगलं काम केलं आहे. जर तुम्हाला हा चित्रपट पाहायचा असेल तर तुम्ही युट्यूबवर फ्रीमध्ये पाहू शकतात.