कोकणातील रेल्‍वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी, 10 अतिजलद गाड्या आता 'या' स्थानकावर थांबणार!

कोकणात जाणाऱ्या प्रवाशांसाठी खूप कमी गाड्या आहेत. लांब पल्ल्याच्या काही विशिष्ट ठिकाणांवरच थांबतात. यामुळे कोकणवासियांमध्ये नाराजी असते.

Pravin Dabholkar | Jan 25, 2025, 17:37 PM IST

Konkan Railway: कोकणात जाणाऱ्या प्रवाशांसाठी खूप कमी गाड्या आहेत. लांब पल्ल्याच्या काही विशिष्ट ठिकाणांवरच थांबतात. यामुळे कोकणवासियांमध्ये नाराजी असते.

1/9

कोकणातील रेल्‍वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी, 10 अतिजलद गाड्या आता 'या' स्थानकावर थांबणार!

Konkan Railway 10 long distance express trains now halt at Roha station

कोकणात जाणाऱ्या प्रवाशांसाठी खूप कमी गाड्या आहेत. लांब पल्ल्याच्या काही विशिष्ट ठिकाणांवरच थांबतात. यामुळे कोकणवासियांमध्ये नाराजी असते.

2/9

जादा गाड्या

Konkan Railway 10 long distance express trains now halt at Roha station

ठराविक गाड्या असल्याने गणपती, शिमगा अशा सणांना जाताना त्या गाड्या तुडूंब भरलेल्या दिसतात. त्यामुळे जादा गाड्या ठेवा किंवा लांब पल्ल्याच्या गाड्यांना इथे थांबे द्या, अशी मागणी कोकणी प्रवासी करत असतात.

3/9

आनंदाची बातमी

Konkan Railway 10 long distance express trains now halt at Roha station

दरम्यान आता कोकणातील रेल्‍वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे.

4/9

मुंबई आणि मंगळूर या बंदरांना जोडणारा रेल्वे मार्ग

Konkan Railway 10 long distance express trains now halt at Roha station

कोकण रेल्वे हा मुंबई आणि मंगळूर या बंदरांना जोडणारा रेल्वे मार्ग आहे. हा मार्ग महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यातून जातो.

5/9

कोकण रेल्वे मार्ग

Konkan Railway 10 long distance express trains now halt at Roha station

कोकण रेल्वेची लांबी 741 किलोमीटर आहे. कोकण रेल्वे मार्गावर एकूण 72 रेल्वे स्थानके आहेत.

6/9

लांबपल्‍ल्‍याच्‍या 10 अतिजलद गाडया

Konkan Railway 10 long distance express trains now halt at Roha station

कोचुवेली इंदोर एक्‍सप्रेस , कोईमतूर हिसार एक्‍सप्रेस, कोचुवेली चंदीगड एकसप्रेस, दादर तिरूनेलवेली एकस्‍प्रेस , कुर्ला टर्मिनस मडगाव एक्‍सप्रेस आदि लांबपल्‍ल्‍याच्‍या 10 अतिजलद गाडया आता रोहा स्‍थानकात थांबणार आहेत.

7/9

कोकणातील प्रवाशांची मागणी पूर्ण

Konkan Railway 10 long distance express trains now halt at Roha station

खासदार सुनील तटकरे यांच्‍या पाठपुराव्‍यामुळे कोकणातील प्रवाशांची बऱ्याच दिवसांपासूनची मागणी पूर्ण झालीय.

8/9

अलिबागपासून खेडपर्यंतच्‍या प्रवाशांना लाभ

Konkan Railway 10 long distance express trains now halt at Roha station

अलिबागपासून खेडपर्यंतच्‍या प्रवाशांना याचा लाभ होणार आहे. कोचुवेली इंदोर एक्‍सप्रेसच्‍या प्रवाशाला खासदार सुनील तटकरे यांनी पहिले तिकीट देवून आणि गाडीला हिरवा झेंडा दाखवला.

9/9

रोहेकरांची गर्दी

Konkan Railway 10 long distance express trains now halt at Roha station

मंत्री आदिती तटकरे यावेळी उपस्थित होत्‍या. गाडीच्‍या स्‍वागतासाठी रोहेकरांनी मोठी गर्दी केली होती.