भर दिवसा रात्रीसारखा अंधार पडणार; 2024 मध्ये येणारं सूर्यग्रहण पुन्हा अनेक वर्ष दिसणार नाही

8 एप्रिल 2024 रोजी वर्षातील पहिले पूर्ण सूर्यग्रहण होणार आहे. 

Nov 02, 2023, 23:11 PM IST

Solar Eclipse 2024 : 2024 वर्षातील पहिले सूर्यग्रहण एप्रिल महिन्यात होणार आहे.  8 एप्रिल  रोजी हे ग्रहण होणार आहे. हे सपूर्ण सूर्यग्रहण असमार आहे. या ग्रहणादरम्यान, सूर्य चंद्राच्या मागे झाकला जाणार आहे. 

1/7

2024 वर्षातील पहिले सूर्यग्रहण 8 एप्रिल 2024 रोजी होत आहे. हे संपूर्ण सूर्यग्रहण असणार आहे. 

2/7

 ग्रहण दक्षिण-पूर्व क्षितिजाच्या 69º वर असेल.चंद्राची 124-मैल-रुंद (199-किलोमीटर) सावली मेक्सिकोच्या किनार्‍यावरील काही बेटांवरून सकाळी 11:07 वाजता उत्तर अमेरिकेतील मजाटलान येथे पोहोचेल. 

3/7

8 एप्रिल रोजी, संपूर्ण सूर्यग्रहण मेक्सिकोसह टेक्साससह अमेरिकेतील 15 राज्यांमध्ये हे ग्रहण दिसणार आहे. 

4/7

या सूर्यग्रहणादरम्यान भर दिवसा रात्रीसारखा अंधार पडणार आहे.  यानंतर असे ग्रहण 2045 मध्ये अमेरिका खंडात होणार आहे.  

5/7

 हे सूर्यग्रहण एकूण 4 मिनिटे, 28 सेकंद दिसणार आहे. 

6/7

 2024 या वर्षातील हे पहिले सूर्यग्रहण भारतात मात्र दिसणार नाही. 

7/7

हे सूर्यग्रहण पश्चिम युरोप, उत्तर अमेरिका, उत्तर दक्षिण अमेरिका, पॅसिफिक अटलांटिक, आर्क्टिकमध्ये दिसणार आहे.