हिवाळ्यात कशी घ्यावी केसांची काळजी? फॉलो करा 'या' टीप्स

हिवाळ्यात केसांची विशेष काळजी घेतली पाहिजे कारण या ऋतूत केस कोरडे आणि राठ होण्याची शक्यता असते. अशा केसांमुळे डँड्रफ आणि केसगळती सारख्या समस्या उद्भवू शकतात. हिवाळ्यात केस छान राहण्यासाठी त्यांची योग्य ती काळजी घेतली पाहिजे.   

Jan 16, 2025, 13:48 PM IST
1/8

तेल लावणे

हिवाळ्यात केस अनेकदा केस कोरडे होतात. यामुळेच आरोग्यतज्ज्ञ, केसांना तेलाने मालिश करण्याचा सल्ला देतात. अशावेळी मालिश करण्यासाठी खोबरेल तेल किंवा बदामाच्या तेलाचा तुम्ही वापर करु शकता. आठवड्यातून 2 ते 3 वेळा केसांना तेल लावून मालिश करणे केसांसाठी फायदेशीर ठरते.   

2/8

ओल्या केसांना टॉवेलने जास्त घासू नका

हिवाळ्यात केसांचा ओलावा कमी होऊ शकतो. म्हणूनच बरेचजण केस सुकवण्यासाठी जास्त प्रमाणात टॉवेलने घासतात. त्यामुळे केसांची योग्य निगा राखण्यासाठी असे करणे टाळले पाहिजे. ओले केस पुसण्यासाठी केसांना हलक्या हाताने टॉवेलने पुसण्याचा सल्ला सुद्धा तज्ज्ञांनी दिला आहे.   

3/8

हॅट किंवा स्कार्फचा वापर

हिवाळ्यात हॅट आणि स्कार्फचा वापर केसांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने अत्यंत उपयुक्त आहे. हॅट आणि स्कार्फचा वापर केल्याने केसांतील ओलावा टिकुन राहतो आणि केस कोरडे होण्यापासून केसांचा बचाव होतो.   

4/8

मॉइश्चरायजिंग शॅम्पू आणि कंडिशनरचा वापर

हिवाळ्यात नेहमी केस धुताना मॉइश्चरायजिंग शॅम्पू आणि कंडिशनरचा वापर केला पाहिजे. केस धुण्यासाठी मध, एलोवेरा किंवा ग्लिसरीन सारखे हायड्रेटेड घटकांचा समावेश असलेल्या शॅम्पूचा वापर करा.   

5/8

केसांवर इलेक्ट्रिक उपकरणांचा वापर करणे टाळा

हिवाळ्यात केस सुकवण्यासाठी बरेचजण इलेक्ट्रिक उपकरणांचा वापर करतात. अशा उपकरणांच्या अधिक वापरामुळे केस कोरडे होण्याची शक्यता असते. त्यामुळे केसांवर इलेक्ट्रिक उपकरणांचा वापर करणे टाळा.  

6/8

पोषक आहार

पोषक आहार फक्त शरीरासाठीच नव्हे तर केसांसाठी सुद्धा कारणीभूत ठरतो. प्रोटीन, व्हिटॅमिन E और ओमेगा 3 फॅटी अ‍ॅसिडचे भरपूर प्रमाण असलेले पदार्थ खाण्याचा सल्ला आरोग्यतज्ज्ञ देतात. तुम्ही तुमच्या आहारात मासे, फळे आणि पालेभाज्यांचा समावेश करायला हवा.  

7/8

गरम पाण्याने केस धुणे टाळा

हिवाळ्यात अनेकांना गरम पाण्याने अंघोळ करणे सोयीचे वाटते. परंतु, केसांसाठी गरम पाणी घातक ठरु शकते. त्यामुळे हिवाळ्यात केस धुताना तुम्ही थंड किंवा अगदीच कोमट पाण्याचा वापर करु शकता.  

8/8

(Disclaimer: इथे देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित आहे. याबद्दल डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. संबंधित माहितीसाठी ZEE 24 Taas जबाबदार नसेल.)