'या' अभिनेत्रीच्या बिकिनी लुकची संसदेत चर्चा, लग्नात आल्या होत्या जिवे मारण्याच्या धमक्या, तुम्ही ओळखलं का?

या अभिनेत्रीने 60 च्या दशकात बिकिनी घालून संसदेत गोंधळ घातला होता. तिला तिच्या लग्नात जीवे मारण्याची धमक्या देखील आल्या होत्या. कोण आहे ही अभिनेत्री? 

| Jan 16, 2025, 15:05 PM IST
1/7

बिकिनीवरून गदारोळ

बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये बिकिनी घालणे किंवा बोल्ड फोटोशूट करणे सामान्य आहे, परंतु एक काळ असा होता जेव्हा यावरून वाद झाला होता.   

2/7

शर्मिला टागोर

शर्मिला टागोर बॉलिवूडमधील टॉप अभिनेत्रींपैकी एक आहे. त्यांनी एकामागून एक हिट चित्रपट दिले आहेत. परंतु त्यांच्या आयुष्याशी संबंधित अनेक वाद आहेत.  ज्यात त्यांच्या प्रेम जीवनाचाही समावेश आहे. 

3/7

कश्मीर की कली

ज्यात अभिनेत्रीला तिच्या लग्नाच्या वेळी मिळालेल्या धमक्यांचा समावेश आहे. अभिनेत्रीने वयाच्या 13 व्या वर्षी करिअरला सुरुवात केली होती. 'कश्मीर की कली' या चित्रपटातून तिला ओळख मिळाली. 

4/7

बिकिनी लूक

या चित्रपटादरम्यान शर्मिलाच्या प्रेमकथेची चर्चा सुरु झाली. अभिनेत्री तिच्या करिअरमध्ये लव्ह लाईफमध्ये आनंदी होती. मात्र, तिच्या बिकिनी लुकने सर्वत्र खळबळ उडवून दिली. 

5/7

पहिली अभिनेत्री

60 च्या दशकात बिकिनी परिधान करून फोटोशूट करणारी शर्मिला टागोर ही पहिली अभिनेत्री ठरली. यापूर्वी अभिनेत्रीने फिल्मफेअर मासिकात एक शानदार फोटोशूट केले होते. 

6/7

एन इव्हनिंग इन पॅरिस

त्यानंतर 'एन इव्हनिंग इन पॅरिस' या चित्रपटात निळ्या रंगाचा स्विमसूट परिधान केला होता. अभिनेत्रीच्या या लूकने सर्वत्र खळबळ उडवून दिली होती. 

7/7

संसदेत चर्चा

तिचे फोटो व्हायरल झाल्यानंतर संसदेतही तिची चर्चा रंगली होती. त्यावेळी शर्मिला म्हणाली की, लोकांनी तिची खूप टिंगल केली. इंडस्ट्रीमधील लोकही तिच्या विरोधात गेले.