वेटर ते 87 एन्काऊंटर स्पेशालिस्ट; सैफ अली खानवरील हल्ल्याचा तपास करणारे दया नायक नेमके कोण?

पुन्हा एकदा एन्काउंटर स्पेशालिस्ट दया नायक चर्चेत आला आहे. अभिनेता सैफ अली खानवर अज्ञात व्यक्तीकडून चाकू हल्ला करण्यात आला. त्याच्यावर मुंबईतील लीलावती रुग्णालयात उपचार सुरु आहे. तर या प्रकरणाची चौकशी क्राईम ब्रँच अधिकारी दया नायक करत आहे. कोण आहे हा दया नायक?

| Jan 16, 2025, 15:23 PM IST
1/11

दया नायक हे गुन्हे शाखेतील नामांकित अधिकाऱ्यांपैकी एक आहेत. दया नायक यांना गेल्या वर्षीच मुंबई पोलिसांनी बढती दिली होती. त्यांनी महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकात (ATS) तीन वर्षे काम केले आहे. दया नायक हे नाव घेतलं की अनेक वाद आणि ते 87 एन्काउंटर ज्येष्ठ पत्रकारांना आठवतात. 

2/11

सामान्य कुंटुबातून आलेले दया नायक यांनी तब्बल 8 वर्षे हॉटेलमध्ये वेटर म्हणून काम केलं. पण आज ते देशातील प्रसिद्ध एन्काउंटर स्पेशालिस्ट म्हणून ओळख आहे. दया नायक नावावर जवळपास 87 एन्काउंटरची नोंद आहे. 

3/11

दया नायक यांचं बालपण गरिबीत गेले. ते मूळचे कर्नाटकचे आहेत. घरची आर्थिक परिस्थिती हलाखीची होती, त्यामुळे सातवीपर्यंत कन्नड शाळेत शिकून ते 1979 मध्ये मुंबईत आले. इथे ते एका हॉटेलमध्ये वेटर म्हणून काम केलं. हॉटेल मालकाने त्यांचं पदवीपर्यंतचं शिक्षण पूर्ण केलं. 

4/11

काही काळ दया नायक यांनी 3000 रुपये प्रति महिना प्लंबर म्हणूनही काम केलंय. त्यानंतर एक वर्षाचे प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर दया 1996 मध्ये जुहू पोलीस ठाण्यात तैनात झाले. 31 डिसेंबरच्या रात्री ड्युटीवर असताना खबरीने छोटा राजन टोळीतील दोन सदस्यांची माहिती दिली. 

5/11

दया त्यांना अटक करण्यासाठी आला असता त्यांनी दया यांच्यावर गोळीबार केला. त्या गोळीबारात दया नायक यांनी पलटवार करत त्या दोघांना ठार केलं. आपण चुकीचं केलं असं दया नायक यांना वाटलं. आता वरिष्ठ आल्यावर नाराज होतील पण त्यांचं कौतुक झालं. 

6/11

दुसरी घटना होती मुंबई दादर परिसरातील फूल मार्केटमधील. तिथे पोहोचताच दहशतवाद्यांनी त्यांच्यावर गोळीबार केला. एवढंच नाही दहशतवाद्यांनी दया नायक यांच्यावर बॉम्बे हल्ला केला. या हल्ल्यात ते जबर जखमी झाले होते. 

7/11

मुंबईतील बडे गुन्हेगार विनोद मतकर, रफिक डबावाला आणि तौफिक कालिया या सारख्या कुख्यार गुंड्यासह तब्बल 87 जणांना त्यांनी ठार केलं. तर 300 हून अधिक गुन्हेगारांना अटक केलीय. दयाने 1999 ते 2003 दरम्यान दाऊदचा भाऊ छोटा राजनच्या टोळीचा सफाया केला होता.

8/11

पण 2003 मध्ये पत्रकार केतन तिरोडकर यांनी दया यांच्यावर अंडरवर्ल्डशी संबंध असल्याचा आरोप केला होता. लोकांना धमकावून बेकायदेशीरपणे पैसे उकळतात. दया डॉन छोटा शकीलच्या साथीने गुन्हेगारी कारवाया करतो, असे म्हणत तिरोडकरने दया यांच्याविरुद्ध न्यायालयात याचिका दाखल केली होती. या प्रकरणानंतर दया यांची महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण (मकोका) अंतर्गत चौकशी करण्यात आली आणि त्या ते निर्दोष असल्याचे सिद्ध झालं. 

9/11

दया यांनी तिच्या येनेहोल गावात शाळा उघडली आहे. ही शाळा त्यांच्या आई राधा नायक ट्रस्टच्या नावाने चालवली जाते. या शाळेच्या उभारणीसाठी दया यांना अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी मदत केली होती. 2000 मध्ये अमिताभ बच्चन यांच्या हस्ते शाळेचे उद्घाटन करण्यात आले. पण काही काळानंतर दाऊद आणि छोटा राजनच्या मदतीने ही शाळा उघडल्याचा आरोप दया यांच्यावर झाला. या आरोपांनंतर दया यांची चौकशी करण्यात आली आणि त्यातही ते निर्दोष ठरले. 

10/11

दया नायक यांनी प्रदीप शर्मा यांच्यासोबत क्राइम ब्रांचमध्ये काही दिवस काम केलं. ते हे शर्मा यांच्या एन्काउंटर स्कॉडमध्ये होते. बेहिशेबी मालमत्ताच्या आरोपावरून 2006 साली त्यांना पोलीस सेवेतून निलंबित करण्यात आलं होतं. 2012 ला दया नायक यांना पुन्हा सेवेत घेण्यात आलं. दया नायक यांना 2014 मध्ये पुन्हा निलंबित करण्यात आलं होतं. त्यानंतर पुन्हा नायक यांना 2016 मध्ये सेवेत घेण्यात आलं.

11/11

तसंच माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणाचा तपास मुंबई गुन्हे शाखा करत आहे. दया नायक हे मुंबई गुन्हे शाखेचे प्रमुख आहेत.