दुध विकले, झोपडपट्टीत राहिले...1000 रुपये उसने घेऊन बाहेर पडले आणि आज आहेत हजारो कोटींच्या मालमत्तेचे मालक

माणूस मेहनत आणि झोकून देऊन काहीही करू शकतो. हे दाखून देणाऱ्या एका व्यक्तीमत्त्वाबद्दल आपण आज जाणून घेणार आहोत.  या व्यक्तीने शून्यातून आयुष्याची सुरुवात केली आणि खर्च भागवण्यासाठी पुस्तके, फटाके विकेले आणि दूधही पोहोचवले. पण आज तीच व्यक्ती हजारो कोटींच्या मालमत्तेची मालक असण्यासोबतच दुबईतील सर्वात श्रीमंत भारतीय आहे.  

| Jan 16, 2025, 16:01 PM IST

माणूस मेहनत आणि झोकून देऊन काहीही करू शकतो. हे दाखून देणाऱ्या एका व्यक्तीमत्त्वाबद्दल आपण आज जाणून घेणार आहोत.  या व्यक्तीने शून्यातून आयुष्याची सुरुवात केली आणि खर्च भागवण्यासाठी पुस्तके, फटाके विकेले आणि दूधही पोहोचवले. पण आज तीच व्यक्ती हजारो कोटींच्या मालमत्तेची मालक असण्यासोबतच दुबईतील सर्वात श्रीमंत भारतीय आहे.

 

1/7

Rizwan Sajan Networth:  रिझवान साजन असं या व्यक्तीचं नाव आहे. रिझवान साजन यांचा जन्म एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. त्यांना लहानपणी आर्थिक समस्यांनाही सामोरे जावे लागले. त्यांनी खर्च भागवण्यासाठी, कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी जे काही काम करता येईल ते केले. आज रिझवान साजन हा दुबईतील सर्वात श्रीमंत भारतीयांपैकी एक आहे. संयुक्त अरब अमिरातीच्या अर्थ मंत्रालयाच्या मते, त्यांच्याकडे सुमारे 2.5 अब्ज अमेरिकन डॉलर्स (सुमारे 21,600 कोटी रुपये) संपत्ती आहे.  

2/7

मात्र या सर्व गोष्टी करत असताना त्यांनी प्रबळ इच्छाशक्ती कायम ठेवली आणि प्रयत्न सुरू ठेवले. आपल्या मेहनतीमुळे आज ते  ज्या स्थानावर पोहोचला आहे, त्या स्थानावर पोहोचणे प्रत्येकासाठी सोपे नाही. मुंबईतील घाटकोपरच्या झोपडपट्टीत जन्मलेल्या रिझवान यांचे बालपण झोपडपट्टीत गेले.

3/7

एका मुलाखतीत रिजवानने सांगितले की, जेव्हा त्याच्या वडिलांनी लॉटरी जिंकली तेव्हा ते एका छोट्या घरात शिफ्ट झाले. तो अनेक किलोमीटर चालत शाळेत जायचा. शाळेच्या कॅन्टीनमधून काहीही खायला घरून त्याला पुरेसे पैसे मिळत नव्हते. येथून त्याने पैसे कमविण्यावर लक्ष केंद्रित करण्याचे ठरवले. रिझवानने सुरुवातीला वडिलांकडून 1000 रुपये उसने घेतले. या पैशातून त्याने काही पुस्तके मोठ्या प्रमाणात विकत घेतली आणि आपल्या मित्राला विकली. यातून त्याला काही पैसे मिळाले.

4/7

खर्च भागवण्यासाठी त्यांनी दूध वाटप, राख्या, फटाके आदींची विक्री केली. ते 16 वर्षांचा असताना त्याच्या वडिलांचे अकाली निधन झाले आणि रिझवानला त्याचे शिक्षण अर्धवट सोडावे लागले. वडिलांच्या निधनानंतर त्यांना घर चालवण्यासाठी पैशांची गरज होती. त्यावेळी ते मुंबईत महिन्याला 6000 रुपये कमावत होते. पण कुवेतमध्ये त्यांचा पगार वाढून सुमारे 15,000 रुपये झाला.

5/7

मुंबईत काम करत असताना रिजवान 1981 मध्ये कुवेतला गेले होते. कुवेतला गेल्यानंतर त्याला थेट महिन्याला १८ हजार रुपयांची नोकरी मिळाली. तेथे त्यांनी आपल्या मामाच्या बांधकाम साहित्याच्या दुकानात प्रशिक्षणार्थी सेल्समन म्हणून करिअरला सुरुवात केली. हळूहळू कुवेतमध्ये त्याचे पद आणि पैसा दोन्ही वाढत गेले. त्यांचे समर्पण आणि काम करण्याची पद्धत त्यांना वेगाने पुढे घेऊन गेली. मात्र, त्याच दरम्यान 1991 मध्ये आखाती युद्धाने त्यांना मुंबईला परतावे लागले. यामुळे काही काळ त्याच्या आकांक्षा थांबल्या होत्या. यानंतर 1993 मध्ये त्यांनी ट्रेडिंग फर्म सुरू केली. यानंतर त्यांच्या आयुष्याचे चाक फिरू लागले.

6/7

अपयशाची भीती न बाळगता, साजनने स्वतःचा मार्ग स्वतःच कोरण्याचा निर्णय घेतला. 1993 मध्ये दुबईमध्ये बांधकाम साहित्याचा व्यवसाय सुरू करणाऱ्या साजनने आपल्या कंपनीचे नाव डॅन्यूब ग्रुप ठेवले. त्यांच्या दूरदृष्टी आणि चातुर्याने या छोट्या व्यवसायाचे UAE मधील सर्वात मोठ्या बांधकाम साहित्य कंपन्यांपैकी एक बनले. 2019 पर्यंत, डॅन्यूब ग्रुपने US$1.3 बिलियनची वार्षिक उलाढाल गाठली आणि बाजारपेठेत आपले स्थान मजबूत केले.  

7/7

साजन यांच्या डॅन्यूब ग्रुपने दुबईमध्ये बांधकाम साहित्याचा व्यवसाय झपाट्याने वाढवला. कंपनीने होम डेकोर, रिअल इस्टेट आणि इतर क्षेत्रातही काम करण्यास सुरुवात केली. यामुळे ओमान, बहरीन आणि सौदी अरेबियासह मध्य पूर्वेच्या बाजारपेठांमध्ये कंपनीला मजबूत स्थान मिळाले. फोर्ब्सनुसार, रिझवानने 2014 मध्ये मध्य पूर्वेतील रिअल इस्टेट क्षेत्रात प्रवेश केला होता. त्यांनी आतापर्यंत UAE मध्ये 25 हून अधिक निवासी प्रकल्प सुरू केले आहेत. यामध्ये लक्झरी प्रकल्पांची संख्या जास्त आहे.