मेथी पाण्यानंतर आता मेथी दूध ट्रेंडिंगमध्ये! 'या' 5 आजारांवर रामबाण उपाय

Fenugreek Milk : वजन कमी करण्यासाठी मेथी पाणी फायदेशीर आहे असं आयुर्देवात सांगण्यात येतं. आता तज्ज्ञ सांगतात की मेथी दुधाच्या सेवनाने आपल्याला अनेक आजारांवर मात करण्यात फायदा होतो. 

| Jul 05, 2024, 14:54 PM IST
1/7

कडू मेथीदाणे आणि दुधाचं सेवन केल्यास आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते. मेथीमध्ये प्रोटीन, चरबी, कार्बोहायड्रेट, कॅल्शियम, आयर्न, फॉलिक अ‍ॅसिड, व्हिटॅमिन ए, सी, बी, मँगनीज, मॅग्नेशियम, पोटॅशियम, तांबे, झिंक आणि फायबर हे पोषक घटक भरपूर प्रमाणात असतं. 

2/7

मेथीदाणे आणि दुधाचे सेवन केल्याने तुमची कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रणात राहण्यास मदत मिळते. मेथी आणि दुधामध्ये व्हिटॅमिन सी (Vitamin C) आणि फायबर सारखे पोषक घटक असल्याने जे खराब कोलेस्ट्रॉल कमी करण्यास फायदेशीर ठरतं. उच्च रक्तदाब आणि हृदयरोग (High Blood Pressure, Heart Disease) दूर ठेवण्यास फायदेशीर ठरतं. 

3/7

पचनसंस्थेसाठी फायदेशीर

मेथी आणि दुधाचे सेवन केल्याने तुमच्या पचनाशी संबंधित समस्या दूर होण्यास फायदेशीर ठरतं. मेथीच्या दाण्यांमध्ये आणि दुधामध्ये फायबर, मॅग्नेशियम आणि जीवनसत्त्वे असल्यामुळे बद्धकोष्ठता, गॅस आणि अ‍ॅसिडिटीची (Constipation, Gas, Acidity) समस्या होतात. (Methi And Milk Benefits)  

4/7

सर्दी-तपावर फायदेशीर

पावसाळ्यात सर्दी, तापामुळे (Cold, Fever) अनेकांना त्रास होतो. याशिवाय कफ, खोकला, दमा आणि ब्राँकायटिसची समस्या असल्यास मेथी पावडर आणि दुधाचे सेवन अतिशय फायदेशीर ठरते.   

5/7

त्वचा आणि केसांसाठी फायदेशीर

त्वचेवरील डाग आणि सुरकुत्या दूर करण्यासाठी मेथी दाणे आणि दुधाचा वापर तुम्हाला उपयुक्त ठरतो. 

6/7

हाडांच्या दुखण्यावर फायदेशीर

मेथी आणि दुधात कॅल्शियम, फॉस्फरस आणि व्हिटॅमिन डी भरपूर प्रमाणात असल्यामुळे तुमची हाडे मजबूत होण्यास मदत मिळते. यासोबतच गाउट, सांधेदुखी आणि हाडांशी संबंधित आजारावर रामबाण उपाय ठरतो.   

7/7

मेथी पावडर मिसळून गरम दूध पिऊ शकता. – मेथीदाणे, मध आणि कोमट दूध घेऊ शकता. (Disclaimer -  वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही. यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. कुठलीही लक्षणं जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.)