PHOTO : 9 देशांतून प्रवास, तरी या नदीवर एकही पूल नाही; कारणही जगावेगळं

2nd Longest River in The World : जगातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात लांब नदी, 9 देशांतून प्रवास तरीही आजपर्यंत त्यावर एकही पूल नाही, कारण जाणूनही तुम्ही आश्चर्यचकित व्हाल. 

नेहा चौधरी | Jan 24, 2025, 14:05 PM IST
1/7

जगातील एकमेव नदी जिच्यावर आजपर्यंत एकही पूल बांधला नाही, विशेष म्हणजे ही नदी तब्बल 9 देशातून प्रवास करते. विशेष म्हणजे जगातील सर्वात मोठी गोड्या पाण्याची नदी आहे. या नदीचं नाव तुम्हाला माहितीये का?

2/7

या नदीच्या दोन्ही बाजूला घनदाट जंगले आणि माती अतिशय मऊ आहे. या नदीचं नाव आहे, अ‍ॅमेझॉन नदी जी दक्षिण अमेरिका खंडातून वाहते. अ‍ॅमेझॉन नदी पेरूच्या अँडीज पर्वतातून उगवते आणि अटलांटिक महासागराला मिळते. दरम्यान, अ‍ॅमेझॉन नदी ब्राझील, बोलिव्हिया, पेरू, इक्वेडोर, कोलंबिया, व्हेनेझुएला, गयाना, फ्रेंच गयाना आणि सुरीनाममधून जाते.

3/7

अ‍ॅमेझॉन नदीची लांबी 6,400 किमी आहे आणि अनेक ठिकाणी तिची रुंदी आश्चर्यकारकपणे 11 किलोमीटरपेक्षा जास्त आहे. काही ठिकाणी ती समुद्रापेक्षा जास्त रुंद दिसते. 

4/7

9 देशांतून गेल्यानंतरही अ‍ॅमेझॉन नदीवर पूल न बनण्यामागे अनेक कारणे आहेत. ॲमेझॉन नदीच्या काठावरील माती अत्यंत मऊ, खूप रुंद, घनदाट जंगले, पूर मैदाने आणि पुरानंतर नदीच्या प्रवाहात वारंवार होणारे बदल यामुळे इथे पूल बांधण्यात अडचणी आहेत.  

5/7

या नदीला जैवविविधतेचे केंद्र म्हटले जाते कारण येथे मोठ्या प्रमाणात प्राणी आणि वनस्पती आढळतात. लाखो वर्षांपूर्वी ॲमेझॉन नदी प्रशांत महासागराच्या विरुद्ध दिशेने वाहत होती, पण आज ही नदी अटलांटिक महासागराला मिळते. आज त्यात मोठ्या प्रमाणात तलाव तयार झाले आहेत.  

6/7

अ‍ॅमेझॉन नदीवर पूल बांधणे अत्यंत आवश्यक असतं तर प्रचंड खर्च आणि सर्व आव्हाने असतानाही हा पूल बांधला गेला असता. पण खरे सांगायचं तर, अ‍ॅमेझॉन नदीवर पूल बांधण्याची गरज नाही, कारण बहुतेक नदी विरळ लोकवस्तीच्या भागातून जाते. तेथे पाण्यासाठी पाइपलाइन टाकल्या आहेत.

7/7

ॲमेझॉन नदीचा प्रवास अतिशय आकर्षक वाटतो कारण या नदीवर पूल नसल्यामुळे फक्त बोटीचाच आधार आहे. या ठिकाणी गुलाबी रंगाच्य डॉल्फिन पर्यटकांना आकर्षित करतात.