प्रजासत्ताक दिनाला स्टायलिश दिसण्यासाठी ट्राय करा 'हे' 5 Trendy Outfit

Republic Day 2025 Stylish Look: 26 जानेवारी 2025 रोजी आपण प्रजासत्ताक दिन साजरा करणार आहोत. संपूर्ण भारतात हा दिवस एखाद्या सणाप्रमाणे साजरा केला जातो. या दिवशी अगदी दिल्लीतील राजपथापासून देशभरातील वेगवेगळ्या शाळांमध्ये, सोसायट्यांसहित अनेक कार्यालयांमध्ये झेंडावंदनाबरोबरच विशेष कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. तुम्ही तुमच्या कार्यालयातील किंवा कॉलेजच्या कार्यक्रमात सहभागी होत असाल,तर हे स्टयलिश पोषाख तुमच्या सुंदर लुकमध्ये आणखीनच भर घालतील.

Jan 24, 2025, 13:58 PM IST
1/5

प्लेन किंवा तिरंगा असलेली साडी

प्रसंग कोणताही असो, साडीची जागा इतर कोणताच पोषाख घेऊ शकत नाही. या प्रसंगासाठी तुम्ही तिरंग्याची साडी नेसू शकता. तिरंग्याची साडी उपलब्ध नसल्यास प्लेन कॉटन किंवा शिफॉनची साडी देखील तुमच्या स्टयलिश लुकला अधिक आकर्षक बनवू शकते. साडीसोबत तुम्ही क्लच किंवा स्लिंग बॅग घेऊ शकता. साडीवर झुमके आणि चॉकलेटी रंगाची लहानशी टीकली लावा. तुमचा हा अनोखा साडी लुक लोकं पाहताच राहतील.  

2/5

इंडो-वेस्टर्न ड्रेस

इंडो-वेस्टर्न लुक आजकाल ट्रेंडमध्ये आहे. तुम्ही फ्लोय व्हाईट स्कर्टवर हिरवा किंवा भगव्या रंगाचा क्रॉप टॉप किंवा शॉर्ट कुर्तीसोबत हा पोषाख ट्राय करू शकता. यावर न्यूड रंगाच्या हील्स खूप शोभतील, एवढेच नाही तर तुमच्या लुकला अजुन सुंदर आणि परिपूर्ण बनवण्यासाठी तुम्ही फ्लोय स्कर्टसह लांब कुर्त्याचादेखील विचार करू शकता.

3/5

व्हाईट क्रॉप टि-शर्ट, ब्लॅक जिन्स आणि तिरंगी स्कार्फ

जर तुमच्या कामाचे ठिकाण दूर असेल किंवा साडी कुर्तीसारखे पोषाख घालण्यात काही अडचण येत असेल, तर तुम्ही नेहमीसारखे कपडे घालूनही स्टाईलीश दिसू शकता. त्यासाठी व्हाईट क्रॉप टि-शर्ट, ब्लॅक जिन्स आणि तिरंगी स्कार्फ घाला. यावर कोणते अनावश्यक मेकअप करू नका. लाईट मेकअपसोबत तुम्ही डायमंड इयरिंग्स घालू शकता, त्यासोबत हातात तिरंग्याचे ब्रेसलेट घाला.  

4/5

चिकन फॅब्रिकची व्हाईट कुर्ती

चिकन फॅब्रिकची व्हाईट कुर्ती हा एक लोकप्रिय ड्रेस कोड आहे. या सिंपल कुर्तीवर तुम्ही कानात लहान चांदीचे झुमके घाला. त्यावर गुलाबी लिपस्टिकसोबत अगदी लाईट मेकअप करा. तुमचा लूक कमीत कमी मेकअपमध्ये अतिशय नैसर्गिक आणि सुंदर दिसेल.

5/5

अर्बनीक सफेद ड्रेप्ड कॉकटेल ड्रेस

प्रजासत्ताक दिनी घालण्यासाठी सर्वात योग्य रंग म्हणजे पांढरा. हा रंग शांततेचा प्रतीक मानला जातो. त्यामुळे तुम्हाला साधे तर दिसायचेच आहे, पण सुंदरही दिसायचे असेल तर अर्बनीक सफेद ड्रेप्ड कॉकटेल ड्रेस नक्कीच ट्राय करा. कॉकटेल ड्रेससाठी पांढरे किंवा इतर अतिशय फिकट म्हणजेच क्रीम, सिल्व्हर किंवा फिकट गुलाबी असे रंग निवडा. या कॉकटेल ड्रेसवर सध्या खूप चर्चेत असलेली मल्टी-कलर बांधणी पर्स घ्या.