सलमानला धमक्या देणाऱ्या गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईवर बनणार अ‍ॅक्शन वेब सीरिज, नावही ठरलं

Web series on Lawrence Bishnoi : बॉलिवूड अभिनेता सलमान खानला धमकी देणारा गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईवर आता वेब सीरिज बनणार आहे. एका निर्मात्याने वेब सीरिजची घोषणा केली आहे. विशेष म्हणजे वेब सीरिजचं नावही जाहीर करण्यात आलं आहे. 

| Oct 18, 2024, 20:52 PM IST
1/7

सलमानला धमक्या देणाऱ्या गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईवर बनणार अ‍ॅक्शन वेब सीरिज, नावही ठरलं

2/7

राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दीकी यांची मुंबईत हत्या करण्यात आली. या हत्येची जबाबादारी गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईने घेतली आहे. बिश्नोई गँगकडून अभिनेता सलमान खानलाही सातत्याने धमक्या दिल्या जात आहेत. गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई हा गुजरातमधल्या जेलमध्ये बंद आहे. 

3/7

आात गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईबाबत नवी माहिती समोर आली आहे. गँगस्टरच्या आयुष्यावर लवकरच एक वेब सीरिज बनणार आहे. एका निर्मात्याने या वेब सीरिजची घोषणा केली असून या वेब सीरिजचं नावही ठरवण्यात आलं आहे. 

4/7

एका न्यूज चॅनेललने दिलेल्या रिपोर्टनुसार जानी फायरफॉक्स फिल्म प्रोडक्शन हाऊसद्वारे गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईवर वेब सीरिज बनवली जाणार आहे. या वेब साीरजमध्ये लॉरेन्स बिश्नोईच्या आयुष्यात काय काय घडलं हे दाखवलं जाणार आहे. या वेब सीरिजमध्ये भरपूर अॅक्शन असणार आहे असं निर्मात्याने सांगितलंय.  

5/7

रिपोर्टनुसार इंडियन मोशन पिक्चर असोसिएशनने गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईवरील वेब सीरिजच्या टायटलाही मान्यता दिली आहे. या वेब सीरिजचं नाव 'लॉरेन्स ए गँगस्टर स्टोरी' असं असणार आहे. या वेबसीरिजमध्ये एका तरुण कसा गँगस्टर बनला याची कहाणी दाखवली जाणार आहे. या सीरिजमध्ये कलाकार कोण असणार याची माहिती अद्याप समोर आलेली नाही

6/7

जानी फायरफॉक्स फिल्म प्रोडक्शन हाऊसचे प्रमुख अमित जानी यांनी दिलेल्या माहितीनुसार ही वेब सीरिज सत्य घटनेवर आधारीत असेल. या प्रोडक्शन हाऊसने याआधीही सत्य घटनांवर चित्रपट आणि वेब सीरिज बनवल्या आहेत. 'कराची टू नोएडा', 'ए टेलर मर्डर स्टोरी' यांचा समावेश आहे. कराची टू नोएडा हा चित्रपट सचिन आणि सीमा हैदरवर आधारीत होता.  

7/7

लॉरेन्स बिश्नोई हा सध्या गुजरातमधल्या साबरमती तुरुंगात बंद आहे. याआधी तो बठिंबा तुरुंगात होता. तुरुंगाभोवती कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे.