सलमान नव्हे तर 'हा' सुपरस्टार बच्चन कुटुंबाचा कट्टर शत्रू, 30 वर्षांपासून वैर; कधीच एकत्र करत नाही काम

This Superstar Rift With Bachchan Family: बॉलिवूडमध्ये दोन अभिनेत्यांमधील वाद, भांडण याबद्दल तुम्ही नेहमी ऐकलं असेल. फिल्म इंडस्ट्रीत तर ही नित्याचं आहे. पण आज आपण अशा एका सुपरस्टारबद्दल जाणून घेणार आहोत, ज्याचा बच्चन कुटुंबाशी 36 चा आकडा आहे. गेल्या 30 वर्षांपासून हे शत्रुत्व सुरु आहे. या सुपरस्टारने एके काळी अमिताभ बच्चन यांच्यासह एका चित्रपटात काम केलं होतं. मात्र नंतर ते सोबत दिसले नाहीत. जाणून घ्य कोण आहे हा सुपरस्टार?  

| Oct 18, 2024, 20:24 PM IST

1/9

2/9

बॉलिवूडमध्ये अभिनेत्यांमधील शत्रुत्वाचे किस्से तुम्ही एनेकदा ऐकले असतील. पण आज आपण अशा एका सुपरस्टारबद्दल जाणून घेणार आहोत, ज्याचा बच्चन कुटुंबाशी 36 चा आकडा आहे. गेल्या 30 वर्षांपासून हे शत्रुत्व सुरु आहे. या सुपरस्टारने एके काळी अमिताभ बच्चन यांच्यासह एका चित्रपटात काम केलं होतं. मात्र नंतर ते सोबत दिसले नाहीत. या अभिनेत्याने ऐश्वर्यासह एका चित्रपटात काम केलं होतं. पणतो चित्रपट कधी रिलीजच झाला नाही. जाणून घ्य कोण आहे हा सुपरस्टार?  

3/9

बच्चन कुटुंब आणि ऐश्वर्या राय यांचं नाव समोर येतं तेव्हा लोकांना सलमान खानच असावा असं वाटतं. पण यावेळी तुमचा अंदाज पूर्णपणे चुकीचा ठरला आहे. हा सुपरस्टार सलमान खान नव्हे. सलमानने ऐश्वर्या रायसोबत 'हम दिल दे चुके सनम'मध्ये काम केलं होतं हे सर्वांनाच माहिती आहे. याशिवाय अमिताभ बच्चन यांच्यासोबत 'बागवान' चित्रपटातही त्याने छोटी भूमिका साकारली होती. हे दोन्ही चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरले होते. आज आम्ही तुम्हाला ज्या सुपरस्टारबद्दल सांगणार आहोत जो नेहमीच विनाकारण शत्रुत्वासाठी ओळखला जातो.   

4/9

आपण येथे सनी देओलबद्दल बोलत आहोत. सनी देओल आणि बच्चन कुटुंबात गेल्या 30 वर्षांपासून कोणताही संवाद नाही. 30 वर्षांपूर्वी 1994 मध्ये आलेल्या 'इन्सानियत' चित्रपटात सनी आणि अमिताभ एकत्र दिसले होते. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरला. या चित्रपटानंतर सनी देओल आणि अमिताभ बच्चन कोणत्याही चित्रपटात एकत्र दिसले नाहीत. या चित्रपटातील सनी देओलच्या भूमिकेला प्रेक्षकांनी पसंती दिली होती. अमिताभ बच्चन यांचे सनी देओलवर स्वतःच्या मुलासारखे प्रेम होतं, असं म्हटले जाते, पण सनीच्या नव्या ओळखीबद्दल ते थोडेसे चिंतेत होते.  

5/9

अमिताभ बच्चन सनी देओलच्या नव्या स्टारडमबद्दल थोडे घाबरू लागले होते आणि त्यामुळे चित्रपटाच्या सेटवर वातावरणात काही बदल झाले होते. IMDB च्या रिपोर्टनुसार, या चित्रपटानंतर सनी देओल आणि अमिताभ बच्चन यांच्यात अनेक गैरसमज झाले. अमिताभ सनीला आपला सर्वात मोठा प्रतिस्पर्धी मानू लागले होते.   

6/9

रिपोर्ट्सनुसार, या चित्रपटात अमिताभ यांची भूमिका छोटी होती, मात्र नंतर ती मोठी करण्यात आली. चित्रपटाच्या पोस्टरमध्ये सनीला दुर्लक्षित करत अमिताभ यांच्याकडे जास्त लक्ष देण्यात आलं होतं.  

7/9

या सर्व घडामोडींनंतर सनी देओलने अमिताभ यांच्यासोबत काम न करण्याची शपथ घेतली. याशिवाय अशा अनेक गोष्टी घडल्या, ज्यामुळे बच्चन कुटुंब आणि सनी देओलमधील अंतर वाढत गेलं.   

8/9

मीडिया रिपोर्ट्सनुसार, 'बॉर्डर' चित्रपटाच्या यशानंतर दिग्दर्शक जेपी दत्ता यांनी सनी देओलला आणखी एक चित्रपट बनवण्याचं आश्वासन दिलं होते. पण जेव्हा त्याने 'LOC: कारगिल' हा सिनेमा बनवला तेव्हा त्यांनी सनी देओलच्या जागी अभिषेक बच्चनला सिनेमात घेतले. यामुळे सनी जेपी दत्ता यांच्यावर रागावला आणि अभिषेकपासूनही दूर राहू लागला.  

9/9

इतकंच नाही तर सनी देओलने बच्चन कुटुंबाची सून ऐश्वर्या राय बच्चनसोबत एका चित्रपटातही काम केलं होतं. पण तो चित्रपट कधीच प्रदर्शित झाला नाही. 1997 मध्ये सनी देओल आणि ऐश्वर्या राय बच्चन पहिल्यांदा 'इंडियन' चित्रपटात एकत्र दिसणार होते, पण हा चित्रपट कधीच प्रदर्शित झाला नाही. यानंतर त्यांच्या नात्यात दुरावा आला. दोघांनीही या चित्रपटासाठी गाणी शूट केली होती. यानंतर ऐश्वर्याने सनीसोबत काम करण्यास नकार दिला. यावर सनीला राग आला आणि त्याने ऐश्वर्याला फटकारले आणि तिनेही तिच्यापासून अंतर ठेवले.