मुंबई : दीपावली आणि छटपूजेनिमित्ताने गावी जाणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढली आहे. प्रवाशांच्या सोईसाठी मध्य रेल्वेने लोकमान्य टिळक टर्मिनस - बरौनी आणि पुणे-पटना दरम्यान विशेष फेस्टिवल ट्रेन चालवण्याचा निर्णय घेतला आहे. या स्पेशल ट्रेन फक्त कन्फर्म टिकिट असलेल्या पॅसेजर्ससाठी असतील.
मध्य रेल्वेच्या मुंबई मुख्यालाकडून मिळालेल्या माहितीनुसार, 05298 स्पेशल ट्रेन लोकमान्य टिळक टर्मिनसवरून 15 नोव्हेंबर 2021 (सोमवर)रोजी दुपारी 12.15 वाजता सुटेल आणि तिसऱ्या दिवशी सकाळी 5 वाजेदरम्यान बरौनी पोहचेल.
बिहारसाठी विशेष ट्रेन
याच प्रकारे 05297 स्पेशल ट्रेन नंबर 13 नोव्हेंबर 2021 (शनिवार)ला बरौनीवरून सायंकाळी 4.30 वाजता सुटेल आणि तिसऱ्या दिवशी सकाळी 10 वाजता लोकमान्य टिळक टर्मिनसला पोहचेल.
ही ट्रने कल्याण, इगतपूरी, नाशिकरोड, भुसावल, खंडवा, इटारसी, पिपरिया, नरसिंहपूर, जबलपूर, कटनी, मैहर, सतना, मानिकपूर, प्रयागराज छिवकी जंक्शन, वारणसी, छपरा, हाजीपूर, मुझफ्फरपूर आणि समस्तीपूर स्टेशनवर थांबेल.
या रेल्वेमध्ये 2 एसी - 2 टिअर, 10 एसी 3 टिअर आणि 9 सेकंड सिटिंग बोगी असेल.
पुणे ते पटना विशेष ट्रेन
या प्रकारे 03382 स्पेशल ट्रेन 14 नोव्हेंबर 2021 (रविवार)रोजी पुण्यावरून सकाळी 5.30 वाजता सुटेल तर दुसऱ्या दिवशी दुपारी 12 वाजता पटनाला पोहचेल. तसेच 03381 स्पेशल ट्रेन दिनांक 12 नोव्हेंबर 2021 (शुक्रवार) रोजी पटनावरून सकाळी 10.40 वाजता रवाना होईल. तर दुसऱ्या दिवशी सायंकाळी 6.50 वाजता पुण्याला पोहचेल.
ही ट्रेन दौ़ड, अहमदनगर, बेलापूर, कोपरगाव, मनमाड, भुसावल, खंडवा, इटारसी, पिपरिया, गाडरवारा, नरसिंहपूर, जबलपूर, कटनी, मैहर, सतना, मानिकपूर, प्रयागराज छिवकी जं, पं. दीन दयाल उपाध्याय जं, बक्सर आणि आरा स्टेशनर थांबेल. या ट्रेन्समध्ये 6 एसी 3 टिअर, 6 स्लिपर क्लास आणि 9 सेकंड सिटिंगचे कोच असतील.
अधिकृत वेबसाइटवर करा बुकिंग
05298 आणि 03382 स्पेशल ट्रेनसाठी बुकिंग शनिवरी (30 ऑक्टोबर2021)पासून सुरू होणार आहे. स्पशेल फिसवर सर्व कॉम्प्युटराज्ड रिझर्वेशन सेंटर्स आणि वेबसाईट www.irctc.co.in वर टिकिट बुक करू शकता. या स्पेशल ट्रेन्सच्या हाल्ट आणि वेळेच्या डिटेल्ससाठी www.enquiry.indianrail.gov.in वर लॉग इन करा.