जगातील सर्वात स्वस्त स्मार्टफोन भारतात होणार लाँच

भारतीय स्मार्टफोन उत्पादक कंपनी रिंगिंग बेल्स या आठवड्यात सर्वात स्वस्त स्मार्टफोन लाँच करणार आहे. या स्मार्टफोनची किंमत साधारण ५०० रुपये इतकी आहे. 

Updated: Feb 16, 2016, 08:53 AM IST
जगातील सर्वात स्वस्त स्मार्टफोन भारतात होणार लाँच title=

नवी दिल्ली : भारतीय स्मार्टफोन उत्पादक कंपनी रिंगिंग बेल्स या आठवड्यात सर्वात स्वस्त स्मार्टफोन लाँच करणार आहे. या स्मार्टफोनची किंमत साधारण ५०० रुपये इतकी आहे. 

केंद्रीय संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर १७ फेब्रुवारीला या स्वस्त स्मार्टफोन फ्रीडम २५१चे लाँचिंग करणार आहेत. जगातील सर्वात स्वस्त असा हा स्मार्टफोन आहे. भारतात स्मार्टफोन मार्केटमध्ये दिवसेंदिवस वाढ होतेय. स्मार्टफोन मार्केटमधील इतर स्मार्टफोन्सना टक्कर देण्यास फ्रीडम २५१ स्मार्टफोन सज्ज झालाय.

सध्या तरी या स्मार्टफोनमध्ये कोणते फीचर्स आहेत याची माहिती मिळू शकलेली नाही. याआधीही रिंगिग बेल्सने २,९९९ रुपये किंमतीचा ४ जी स्मार्टफोन लाँच केला होता. यात कंपनीने पाच इंचाचा डिस्प्ले, १.३ गिगाहर्टझ क्वाडकोर प्रोसेसर, १ जीबी रॅम आणि ८ जीबी इंटरनल मेमरी असे फीचर्स दिले होते.