मुंबई: महिलांच्या शर्टाची बटणं ही डाव्या बाजूला तर पुरुषांच्या शर्टाची बटणं ही उजव्या बाजूला असतात. पण या मागचं खरं कारण अनेक जणांना कदाचित माहितीच नसेल.
आपल्या शर्टाच्या बटणांच्या बाजूमागे वेगवेगळे तर्क आहेत. असं बोललं जातं की सुरवातीच्या काळामध्ये पुरुष स्वत:च आपले कपडे घालायचे, तर महिलांना दुसऱ्या महिला कपडे घालायच्या. बहुतेक जण उजव्या हातानं काम करत असल्यामुळे महिलांच्या कपड्यांची बटणं डाव्या बाजूला असतात.
तर दुसरा तर्क असाही आहे की, पूर्वीच्या काळी पुरुष उजव्या हातामध्ये तलवार ठेवायचे, तर महिल्यांच्या डाव्या हातामध्ये मुल असायचं. पुरुषांना बटण लावण्यासाठी डाव्या हाताचा वापर करायला लागायचा, त्यामुळे त्यांच्या शर्टाचं बटण उजव्या बाजूला तर महिलांच्या शर्टाचं बटण डाव्या बाजूला असतं.
काही जण या सगळ्याला नेपोलियन जबाबदार असल्याचंही बोलतात. नेपोलियननं महिलांच्या कपड्यांची बटणं डाव्या बाजूला ठेवण्याचे आदेश दिले.
नेपोलियन नेहमी एक हात शर्टामध्ये टाकून उभे राहायचे, त्यामुळे महिला त्याला चिडवून त्याची नक्कल करायच्या. महिला आपल्यापेक्षा वेगळ्या दिसाव्यात यासाठी नेपोलियनं हे आदेश दिल्याचंही बोललं जातं.