नवी दिल्ली: भारतीय समाज भले ही स्वत:ला प्रत्येक बाबतीत प्रगत मान असेल, पण आजही महिलांच्या बाबतीत या पुरुष प्रधान समाजाची विचारसरणी काही बदलत नाही. खासकरून जेव्हा प्रकरण हे वर्जिनिटीबद्दल असेल.
आपण स्वत: वर्जिन नसलो तरी चालेल पण बायको वर्जिनच पाहिजे असा विचार करणारे स्वत:ला धन्य मानतात.
‘YTV’नेटवर्कनं यू-ट्यूबवर एक जबरदस्त व्हिडिओ टाकलाय. ज्यात तरुण-तरुणींना विचारलं गेलंय वर्जिन पत्नी का हवी? या प्रश्नावर लोकांनी असे काही उत्तरं दिलेत, ते ऐकून तुम्ही थक्क व्हाल.
काही जणांचं म्हणणं आहे की, ते स्वत: वर्जिन नसलं तरी चालेल तरी पत्नी वर्जिन पाहिजे. तर काहींना वाटतं मुलींनी पवित्र असलं पाहिजे. तर काहींना यासर्वाचा काही फरक पडत नाही.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.