१०वी पाससाठी CRPFमध्ये ३०२५ पदांसाठी भर्ती

आपण १०वी पास आहात? तर आपल्याकडे सैन्यात नोकरी करण्याची सुवर्ण संधी आहे. कारण केंद्रीय रिझर्व्ह पोलीस फोर्स म्हणजेच सीआरपीएफमध्ये कॉन्स्टेबल (ट्रेड अँड टेक्निकल) पदासाठी ३०२४ जागा उपलब्ध झाल्या आहेत. इच्छुक उमेदवार २० डिसेंबर २०१४पर्यंत आपला अर्ज दाखल करू शकतात. 

Updated: Dec 1, 2014, 11:51 AM IST
१०वी पाससाठी CRPFमध्ये ३०२५ पदांसाठी भर्ती title=

नवी दिल्ली: आपण १०वी पास आहात? तर आपल्याकडे सैन्यात नोकरी करण्याची सुवर्ण संधी आहे. कारण केंद्रीय रिझर्व्ह पोलीस फोर्स म्हणजेच सीआरपीएफमध्ये कॉन्स्टेबल (ट्रेड अँड टेक्निकल) पदासाठी ३०२४ जागा उपलब्ध झाल्या आहेत. इच्छुक उमेदवार २० डिसेंबर २०१४पर्यंत आपला अर्ज दाखल करू शकतात. 

महत्त्वाच्या तारखा-

> अर्ज भरण्याची अखेरची तारीख – २० डिसेंबर २०१४
> लेखी परीक्षा – १ मार्च २०१५

पदांचा तपशील:

> पदाचं नाव – कॉन्स्टेबल (ट्रेड अँड टेक्निकल)
> पदांची संख्या – ३०२४

वयोमर्यादा:  

> २१ ते २७ वर्ष ड्रायव्हर पदासाठी
> १८ ते २३ वर्ष इतर पदांसाठी (आरक्षित वर्गांना नियमानुसार सूट)

शैक्षणिक पात्रता: 

> अर्जदारानं कोणत्याही मान्यता प्राप्त विद्यालयातून किंवा संस्थेतून १०वी पास केलेली असावी

नोट: टेक्निकल पदासांठी अर्जदाराजवळ आयटीआय प्रमाणपत्र आणि ड्रायव्हर पदासाठी ड्रायव्हिंग लायसंस आणि ड्रायव्हिंगचा अनुभव आवश्यक आहे. 

वेतन:

५,२००-२०,२००/- रुपये 

निवड प्रक्रिया: उमेदवाराची निवड लेखी परीक्षा, शारिरीक चाचणी, ट्रेड परिक्षण आणि मेडिकल चाचणीच्या आधारे केलं जाईल. 

अर्ज करण्याची पद्धत:

योग्य आणि इच्छुक उमेदवारानं २० डिसेंबर २०१४पर्यंत ऑनलाइन अर्ज भरायचा आहे. 

अधिक माहितीसाठी आपण सीआरपीएफची वेबसाइट www.crpf.nic.in किंवा www.crpf.gov.in वर लॉग इन करू शकता. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.