माहिती लीक : ... असं असेल व्हॉटस अप 'व्हिडिओ कॉलिंग' इंटरफेस!

व्हॉटसअप युझर्ससाठी एक खुशखबर आहे. यूझर्सला बऱ्याच कालावधीपासून प्रतिक्षा असलेलं 'व्हिडिओ कॉलिंग' फिचर लवकरच व्हॉटसअपमध्ये समाविष्ट होणार असल्याचं समजतंय. 

Updated: Dec 26, 2015, 04:33 PM IST
माहिती लीक : ... असं असेल व्हॉटस अप 'व्हिडिओ कॉलिंग' इंटरफेस! title=

मुंबई : व्हॉटसअप युझर्ससाठी एक खुशखबर आहे. यूझर्सला बऱ्याच कालावधीपासून प्रतिक्षा असलेलं 'व्हिडिओ कॉलिंग' फिचर लवकरच व्हॉटसअपमध्ये समाविष्ट होणार असल्याचं समजतंय. 

जर्मनीच्या एका वेबसाईटनं ही माहिती दिलीय. या वेबसाईटनं व्हॉटसअपच्या 'आयओएस' अॅपचे काही स्क्रीनशॉटही सोबत शेअर केलेत. हे स्क्रीन शॉट व्हॉटसअप कॉलिंगचे आहेत. 

व्हॉटसअपचं २.१२.१६.२ या आयओएस वर्जन अजून टेस्टिंग सुरू असल्याचं सांगण्यात येतंय. येत्या वर्षात व्हॉटसअपच्या या फिचरला रोलआऊट करण्यात येऊ शकतं, असं म्हटलं जातंय.  

व्हाट्सऐप से आप कर पाएंगे वीडियो कॉल, जानकारी हुई लीक
व्हॉटसअपचं कॉलिंग फिचर

कसं आहे हे व्हॉटसअपचं व्हिडिओ कॉलिंग फिचर...

- या फोटोंमध्ये व्हॉटसअप कॉलिंग इंटरफेसवर हिरव्या रंगाचा टॅब दिसतोय. 

- यामध्ये यूझर्सला म्यूट करण्याचा पर्यायही उपलब्ध असलेला या स्क्रीनशॉटमध्ये दिसतोय. - - व्हि़डिओ कॉल दरम्यान कॅमेरा स्वीच करता येणं शक्य असेल.

- हा यूझर इंटरफेस यूझर्सना एका चॅट टॅबमधून दुसऱ्या चॅट टॅबवर सरळ जाण्याची संधीही देणार आहे. यासाठी अॅपच्या होम चॅट स्क्रीनवर जाण्याची गरज नाही. 

आत्तापर्यंत व्हॉटसअपच्या युझर्सची संख्या ९० करोडहून जास्त आहे. अत्यंत लोकप्रिय असलेल्या या अॅपमध्ये फेसबुक, गूगल हॅंगआऊट आणि स्काईपप्रमाणे व्हॉईस कॉलिंग फिचर नाही. त्यामुळे हे मागे पडतंय की काय असं वाटत असतानाच व्हॉटसअपच्या युझर्ससाठी ही नक्कीच आनंदाची बातमी ठरणार आहे.