...आणि गाय ठरली 'पर्सन ऑफ द इअर'

'पर्सन ऑफ द इअर'च्या यादीत आपणं आत्तापर्यंत अनेक प्रसिद्ध व्यक्तींची नावं ऐकलेली असतील... पाहिली असतील... पण, यंदा मात्र 'गाय' पर्सन ऑफ द इअर ठरलीय. होय, सर्च इंजिन 'याहू'नं गायीला 'पर्सन ऑफ द इअर' म्हणून घोषित केलंय. 

Updated: Dec 22, 2015, 03:58 PM IST
...आणि गाय ठरली 'पर्सन ऑफ द इअर' title=

मुंबई : 'पर्सन ऑफ द इअर'च्या यादीत आपणं आत्तापर्यंत अनेक प्रसिद्ध व्यक्तींची नावं ऐकलेली असतील... पाहिली असतील... पण, यंदा मात्र 'गाय' पर्सन ऑफ द इअर ठरलीय. होय, सर्च इंजिन 'याहू'नं गायीला 'पर्सन ऑफ द इअर' म्हणून घोषित केलंय. 

'याहू' या सर्च इंजिनवर ज्या गोष्टीबद्दल वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मरून विविध चर्चा झडल्या... ती होती 'गाय'! त्यामुळेच, बहुचर्चित अशा साध्या-सुध्या गायीला ऑनलाईन जगतातील 'पर्सनॅलिटी ऑफ द इअर'चा दर्जा मिळालाय. 

वार्षिक ट्रेन्डचा अभ्यास केल्यानंतर ही गोष्ट समोर आलीय. हा अभ्यास वर्षभरातील चर्चित व्यक्ती, गोष्टी आणि मुद्द्यांचा विचार करतो. समीक्षेनुसार, महाराष्ट्र सरकारनं राज्यात गोमांसवर बंदी लावल्यानंतर अचानक 'गाय' या मुद्यावर कळत-नकळतपणे इतकी चर्चा झडली आणि तो एक वादाचाही विषय बनला.

गायीशिवाय यंदाच्या वर्षात राजकीय वर्तुळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यंदाच्या वर्षांतील सर्वात चर्चित असा विषय ठरले. मोदींनंतर या श्रेणीत बिहारचे मुख्यमंत्री नीतीश कुमार आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या नावाचाही समावेश आहे.