मुंबई : आज दिनांक २ फेब्रुवारीला फेसबूकचा संस्थापक मार्क झुकरबर्ग याने फेसबूकवर एका पोस्टद्वारे 'व्हॉट्सअॅप' या इन्सन्ट मेसेजिंग अॅपचे आता जगभरात १ बिलियन म्हणजेच एक अब्ज ग्राहक झाल्याची घोषणा केली.
जॅन कोऊम आणि ब्रायन अॅक्टन या दोघांनी २००९ साली व्हॉट्सअॅपची सुरुवात केली होती. पुढे २०१४ साली मार्क झुकेरबर्गच्या फेसबुकने हे अॅप १९ अब्ज डॉलर्सना विकत घेतले.
सध्या व्हॉट्सअॅपवर दररोज ५३ भाषांमध्ये साधारणतः १.६ अब्ज फोटोज आणि २५ कोटी व्हिडिओज शेअर केले जातात. तर दिवसाला ४२ अब्ज मॅसेजेस केले जातात.
"एक अब्ज लोक आता दररोज व्हॉट्सअॅप वापरतात. इतक्या मोठ्या प्रमाणात लोक व्हॉट्सअॅपशी जोडली गेली आहेत. जगाशी जोडले जाण्याच्या मार्गातील हा एक मैलाचा दगड आहे, असे मार्कने एका फेसबूक पोस्टमध्ये म्हटले आहे.
जानेवारी महिन्यातच व्हॉट्सअॅप जगभरातील ग्राहकांसाठी कायमस्वरुपी मोफत उपलब्ध करुन देण्याची घोषणा फेसबुकने केली होती.