नवी दिल्ली : सॅमसंगनं आपला दमदार स्मार्टफोन 'गॅलक्सी नोट एज' भारतात लॉन्च केलाय. या स्मार्टफोनची विक्री आगामी वर्षात म्हणजेच जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सुरू होईल.
भारतात हा स्मार्टफोन दोन रंगांत उपलब्ध होईल. 'चारकोल ब्लॅक' आणि 'फॉरेस्ट व्हाईट' अशा दोन रंगांत हा फोन उपलब्ध असेल. गॅलक्सी नोट आपल्या 'कर्व्ह डिस्प्ले'मुळे याअगोदरच खूप चर्चेत राहिलाय. या कर्व्ह डिस्प्लेवर नोटिफिकेशन, व्हिडिओ प्ले बॅक, अॅप शॉर्टकट, कॅमेरा यांसारखे फिचर्स दिसतील.
आपल्या डिव्हाईसेसवर वेगवेगळे आणि नवीन प्रयोग करण्यासाठी 'सॅमसंग'ला ओळखलं जातं. 'सॅमसंग'शिवाय आत्तापर्यंत कोणत्याही स्मार्टफोनमध्ये कर्व्ह डिस्प्ले बनवण्यात आलेला नाही.
या स्मार्टफोनची किंमत आहे फक्त ६४,९०० रुपये.
'गॅलक्सी नोट एज'ची वैशिष्ट्य...
स्क्रिन : ५.६ इंच
कर्व्ह डिस्प्ले : २५६० X ११४० + १६० पिक्सल
प्रोसेसर : २.७ जीबी क्वॉडकोर प्रोसेसर
रॅम : ३ जीबी
ऑपरेटींग सिस्टम : किटकॅट
रिअर कॅमेरा : १६ मेगापिक्सल
फ्रंट कॅमेरा : ३.७ मेगापिक्सल
मेमरी : ३२ जीबी आणि ६४ जीबी अशा दोन ऑप्शन्समध्ये उपलब्ध (मेमरी कार्डच्या साहाय्याने ६४ जीबीपर्यंत वाढवलं जाऊ शकतं)
बॅटरी : फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजिसहीत ३००० मेगाहर्टझची बॅटरी
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.