Independence Day: टेलिफोन कंपन्यांकडून जबरदस्त डेटा पॅकची ऑफर

69वा स्वातंत्र्यदिनाच्या निमित्तानं टेलिफोन कंपन्यांनी जबरदस्त सेल आणि ऑफर्सची स्पर्धा लागलीय. आपल्या यूजर्ससाठी कंपनी स्वातंत्र्यदिनाच्या निमित्तानं तरुणांना आकर्षित करण्यासाठी विशेष ऑफर्स दिल्या आहेत.

Updated: Aug 13, 2015, 04:34 PM IST
Independence Day: टेलिफोन कंपन्यांकडून जबरदस्त डेटा पॅकची ऑफर title=

मुंबई: 69वा स्वातंत्र्यदिनाच्या निमित्तानं टेलिफोन कंपन्यांनी जबरदस्त सेल आणि ऑफर्सची स्पर्धा लागलीय. आपल्या यूजर्ससाठी कंपनी स्वातंत्र्यदिनाच्या निमित्तानं तरुणांना आकर्षित करण्यासाठी विशेष ऑफर्स दिल्या आहेत.

 

बीएसएनएल

स्वातंत्र्यदिनी BSNL आपल्या प्रिपेड ग्राहकांसाठी नव्या ऑफर देत आहेत. विशेष म्हणजे या ऑफर्समध्ये सर्वात महत्त्वाचा आहे त्या डेटा पॅकच्या ऑफर्स. ज्यात कंपनी यूजर्सला 10 टक्के एक्स्ट्रा डेटा ऑफर देत आहे ही ऑफर 14 ते 17 ऑगस्टपर्यंत आहे. 

म्हणजे जर आपण 98 रुपयांचं रिचार्ज केलं तर त्यात आपल्याला 1.1 जीबी 2G डेटा मिळतो आणि याची व्हॅलिडिटी 28 दिवसांपर्यंत राहते. पण स्वातंत्र्यदिनानिमित्त असलेल्या ऑफरमध्ये आपल्याला कंपनी याच किमतीत 1.21 GB   डेटा मिळेल. 

सोबतच एक्स्ट्रा व्हॅलिडिटी सुद्धा मिळेल. म्हणजे आपण 5GB 2G डेटा रिचार्ज करत असाल तर कंपनी आपल्याला 30 दिवसांची व्हॅलिडिटी देत असते. पण स्वातंत्र्यदिनानिमित्त असलेल्या ऑफर अंतर्गत कंपनी आपल्याला याच किमतीत 60 दिवसांची व्हॅलिडिटी देईल.

 

रिलायंस
भारताच्या स्वातंत्र्यदिनानिमित्त रिलायंस कंपनीनं आतापर्यंत कोणत्या डेटा पॅकची ऑफर दिली नाहीय. मात्र कंपनी आपल्या यूजर्ससोबत नवनवीन पद्धतीनं स्वातंत्र्य दिन साजरा करणार आहे. 

स्वातंत्र्य दिनानिमित्त यूजर्सना #SaluteSelfie सोबत आपला सेल्फी ट्विटरवर शेअर करायला सांगतीलंय. ज्यामुळं (GSM+CDMA) यूजज्ञस 10 ते 15 ऑगस्ट 2015 पर्यंत ट्विटर मोफत एक्सिस करू शकतील. एवढंच नव्हे तर GSM यूजर्स फेसबुक आणि व्हॉट्स अॅप सुद्धा फ्रीमध्ये एक्सेस करू शकरणार आहेत.

 

वोडाफोन
वोडाफोन कंपनीनं आपल्या ग्राहकांना डबल डेटाची ऑफर दिलीय. या अंतर्गत यूजर्स डेटा पॅक घेत असतील. तर त्यांना तेव्हढाच डेटा फ्री दिला जाईल. कंपनीची ही ऑफर 30 ऑक्टोबरपर्यंत व्हॅलिड आहे. 2G, 3G यूजर्स कंपनीच्या या ऑफरचा फायदा घेऊ शकतील.

जर यूजर 1GB डेटाचं रिचार्ज करत असेल तर यूजरला डबल डेटा ऑफर अंतर्गत त्याच किमतीत 2GB डेटा मिळेल.. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.