मुंबई : मार्च २०१५ मध्ये होणार्या दहावीच्या परीक्षेचे अर्ज ऑनलाइन पद्धतीने भरावयाचे आहेत. सोमवार दि. १० नोव्हेंबरपासून शाळांमधून अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे.
www.mahahsscboard. maharashtra.gov.in या वेबसाइटवर परीक्षा अर्ज भरण्यात येतील. परीक्षा अर्जात काही चुका राहू नयेत यासाठी विद्यार्थ्यांनी शाळेमार्फतच अर्ज भरावेत, अशा सूचना राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे सचिव कृष्णकुमार पाटील यांनी दिल्या आहेत.
ऑनलाइन अर्ज भरण्यासंदर्भात मुख्याध्यापकांना काही अडचणी असल्यास त्यांनी विभागीय शिक्षण मंडळाशी संपर्क साधावा. तर अर्ज भरलेल्या विद्यार्थ्यांच्या याद्या, प्रचलित शुल्काप्रमाणे बँक ऑफ इंडियाची चलनाची प्रत दिलेल्या मुदतीत सादर करावी, असे आवाहनही करण्यात आले आहे.
अर्ज भरण्याचे वेळापत्रक
# १० ते २० नोव्हेंबर - ऑनलाइन परीक्षा अर्ज भरणे.
# २१ ते २६ नोव्हेंबर - परीक्षा शुल्क बँकेत चलनाद्वारे भरणे.
# २८ नोव्हेंबर - विद्यार्थ्यांच्या याद्या, चलन मंडळाकडे जमा करणे.
# २१ ते २८ नोव्हेंबर - विलंब शुल्कासह परीक्षा अर्ज भरणे,
# २९ नोव्हेंबर ते ३ डिसेंबर - विलंब शुल्क बँकेत चलनाद्वारे भरणे.
# ५ डिसेंबर - विद्यार्थ्यांच्या याद्या, चलन मंडळाकडे जमा करणे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.