मुंबई : ‘नोकिया’च्या ग्राहकांना आता या कंपनीला शेवटचं गुड बाय म्हणावचं लागणार आहे... कारण, पुढच्या आठवड्यातच पहिला-वहिला मायक्रोसॉफ्ट ल्युमिया बाजारात दाखल होतोय. यामुळे, ‘नोकिया’ युगाचा अंत झालाय असं म्हणावचं लागेल.
पण, हीदेखील एक चांगली सुरुवात ठरेल असं दिसतंय. ११ नोव्हेंबर रोजी ‘नोकिया’चं नाव वगळून आपल्या नावासहीत पहिला स्मार्टफोन बाजारात आणायला ‘मायक्रोसॉफ्ट’ तयार आहे. खिशाला परवडणारा हा फोन असेल, असा दावाही या कंपनीनं केलाय.
कसा असेल ‘मायक्रोसॉफ्ट ल्युमिया?’
पाच इंचाची qHD स्क्रीन, १.२ गीगाहर्टझ् प्रोसेसर, १ जीबी रॅम... किंमतीच्या बाबतीत मात्र मायक्रोसॉफ्ट ‘नोकिया’च्या पावलांवर पाऊल ठेवणार नाहीय. त्यामुळे हा स्मार्टफोन स्वस्त असेल असा कंपनीचा दावा आहे.
सहा महिन्यांपूर्वी 'मायक्रोसॉफ्ट'ने 'नोकिया' कंपनी विकत घेतली होती. हा व्यवहार २५ एप्रिल रोजी पूर्ण झाला. मोबाईलसाठी 'नोकिया' हा ब्रॅंड आणखी दहा वर्षे वापरण्याचा परवाना 'मायक्रोसॉफ्ट'ला मिळाला होता. त्यानुसार, सुरुवातीला 'ल्युमिया' हा विंडोज फोन बाजारात आणताना 'नोकिया' हेच नाव त्यांना दिलं गेलं होतं. या श्रेणीला चांगला प्रतिसाद मिळाल्यानंतर आता 'नोकिया'ऐवजी 'मायक्रोसॉफ्ट' हा ब्रॅंड वापरला जाणार आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.