सर्वाधिक मायलेज देणारी 'स्प्लेंडर आय स्मार्ट'

हिरो मोटो कॉर्प आपली एक नवीन बाईक लवकरच बाईक बाजारात उतरवण्याच्या तयारीत आहे. आपली ही नवीन बाईक जगभरात इतर बाईकपेक्षा सर्वाधिक मायलेज देणारी बाईक असेल असा दावा, 'हिरो'नं केलाय. 

Updated: Apr 6, 2015, 01:30 PM IST
सर्वाधिक मायलेज देणारी 'स्प्लेंडर आय स्मार्ट' title=

मुंबई : हिरो मोटो कॉर्प आपली एक नवीन बाईक लवकरच बाईक बाजारात उतरवण्याच्या तयारीत आहे. आपली ही नवीन बाईक जगभरात इतर बाईकपेक्षा सर्वाधिक मायलेज देणारी बाईक असेल असा दावा, 'हिरो'नं केलाय. 

'स्प्लेंडर आय स्मार्ट' असं या नव्या बाईकचं नाव आअसेल. न्यू जनरेशनला नजरेसमोर ठेऊन बनवण्यात आलेल्या या बाईकची टेस्टिंग यशस्वीरित्या पार पडलीय. तसंच त्याला सर्टिफिकेटही मिळालंय. 

केंद्र सरकारची एजन्सी 'इंटरनॅशनल सेंटर फॉर ऑटोमोटिव्ह टेक्नॉलॉजी'कडून (आयकॅट) मार्चमध्ये सर्टिफाइड फ्युएल एफिशिएन्सी (एफई) व्हॅल्यूनुसार, या बाईकनं एक लीटर पेट्रोलमध्ये 102.50 किलोमीटर मायलेज दिलंय. 

कंपनीनं दिल्लीमध्ये एलॉय व्हिलच्या मॉडेलची शोरुम किंमत 51,100 रुपये आणि स्पोक व्हिल मॉडेलची किंमत 50 हजार रुपये निर्धारित केलीय. 
 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.