वॉशिंग्टन : स्मार्टफोन्सच्या मार्केटमध्ये सॅमसंगनं आणखी चार गॅलेक्सी स्मार्टफोन लॉन्च केले आहेत. अनेक मोबाईल कंपन्यांनी अँड्रॉईड किटकॅट 4.4 लाँच केल्यानंतर सॅमसंगनंही हे पाऊल उचललं. विशेष म्हणजे हे चार स्मार्टफोनच्या किमतीही बजेटमध्ये आहेत.
नव्या मोबाईलची वैशिष्ट्ये:
सॅमसंग गॅलेक्सी कोर-2- या मध्ये 4.5 इंचचा टीएफटी डिस्प्ले असून क्वार्ड-कोर प्रोसेसरही आहे. यामध्ये 5 मेगापिक्सेलचा ऑटोफोकस कॅमेरा आणि वीजीए फ्रंन्ट कॅमेरा आहे. फोनमध्ये 768 क्षमतेची रॅम, 4 जीबीची इंटरनल स्टोरेज आहे. यासोबतच 64 जीबीपर्यंतचे मायक्रो एसडी कार्ड यामध्ये बसविण्याची सुविधा आहे.
सॅमसंग गॅलेक्सी एस-4- यामध्ये दोन मॉडेल आहेत. एक एलटीई आणि दुसरा 4जी असे दोन मॉडेल आहेत. एलटीईमध्ये 1 जीबी रॅम आणि 3जीमध्ये 512 जीबी रॅंम आहे. एलटीईमध्ये 1.2 गीगाहर्ट्स ड्युअल कोर प्रोसेसर आहे तर 3जीमध्ये 1 गीगाहर्ट्स ड्युअल कोर प्रोसेसर आहे. दोन्ही मोबाईलमध्ये 5 मेगापिक्सेल कॅमेरा आणि वीजीए फ्रंन्ट कॅमेरा आहे. दोन्ही सेटमध्ये ब्लूटूथ, वाई-फाई आणि यूएसबी कनेक्टिव्हिटी आहे.
सॅमसंग गॅलेक्सी यंग-2 यामध्ये 3.5 इंचाच्ये टीएफटी स्क्रीनसह 1 गीगहर्ट्सचा सिंगल कोर प्रोसेसर आहे. तसेच 512 एमबी रॅमसह 4 जीबी इंटरनल स्टोरेज आहे. 32 जीबीपर्यंत वाढवता येवू शकते. याचा कॅमेरा 3 मेगापिक्सेलचा आहे. वाय-फाय, ब्लूटूथसह जीपीएसचीही सुविधा आहे. यामध्ये दोन रंगाचे फोन्स उपलब्ध आहेत.
सॅमसंग स्टार-2- या सिरीजमधला शेवटचा आहे. याची स्क्रीन 3.5 इंच इतकी आहे. 1 गीगाहर्ट्ससह सह सिंगल कोर स्प्रैडट्रम प्रोसेसर आहे. तसेच 2 मेगापिक्सेलचा फिक्स्ड फोकस रियर कॅमेरा आहे. यामध्ये 4 जीबी इंटरनल स्टोरेजची क्षमता असून 32 जीबीपर्यंत ती वाढवता येऊ शकते. याची बॅटरी 1300 एमएएच आहे तसेच ब्लूटूथ आणि वाय-फायसारखे फीचर्स यात आहेत. मात्र हा फोन 3जी सपोर्ट करत नाही.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.