नवी दिल्ली : भारतीय रेल्वेने आपल्या ऑनलाईन बुकींगमध्ये सुधारणा केली आहे. त्यामुळे तुम्हचे आरक्षण एका चुटकीसरर्शी होऊ शकणार आहे. पूर्वीचे संकेतस्थळ आता अधिक वेगवान बनविण्यात आले आहे. हा वेग चार पटीने वाढविण्यात आला आहे.
आपल्याला आरक्षण करायचे असेल तर IRCTC या वेबसाइट वर नेहमी समस्यांचा सामना करावा लागत असे. आता यातून तुमची सुटका झाली आहे. कारण रेल्वेने नवीन सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. रेल्वेने आरक्षणासाठी नवीन वेबसाईन लाँच केली आहे.
इंडियन रेल्वे कॅटरिंग अॅण्ड टुरिझम कॉर्पोरेशनने आपली नवीन वेबसाईट आधुनिक व्हर्जनसह लाँच केली आहे. रेल्वेच्या संकेतस्थळापेक्षा चार पटीने पेक्षा वेगवान आहे.
IRCTC या वेबसाइटच्या पुढील 10 वर्षांचा विचार करुन आधुनिक पद्धतीने तयार करण्यात आली आहे. या संकेतस्थळासाठी करोडो रुपये खर्च करण्यात आले असून हार्डएअर आणि सॉफ्टवेअरने अपग्रेड केले आहे. मात्र, IRCTC वर जास्त युजर्स असल्याने ही वेबसाइट हँग होती. त्यामुळे ग्राहकांना समस्यांचा सामना करवा लागतो. त्यामुळे IRCTCने हे नविन बदल केलाय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.