मॉस्को : सेल्फीचं फॅड तरुण-तरुणींनींमध्ये किती वेगानं शिरलंय याचा अंदाज गेल्या काही दिवसांतील सेल्फी दुर्घटनांवर टाकल्यास तुमच्या लक्षात येईल. त्याचमुळे, आता सरकारलाच या प्रश्नावर पुढाकार घ्यावा लागतोय.
रशियात आत्तापर्यंत सेल्फी काढण्याच्या नादात अनेक जणांना आपले प्राण गमावावे लागलेत. त्यामुळे, रशिया सरकारनं तरुण-तरुणींना सावधान करण्यासाठी एक मोहीमच सुरू केलीय. एक बुलेटीन जारी करून सरकारनं तरुण-तरुणींपर्यंत संदेश पोहचवण्याचं काम केलंय.
सरकारद्वारे जाहीर करण्यात आलेल्या पोस्टरवर धोकादायक ठिकाणी सेल्फी घेताना आणि तसं न करण्याबद्दल सुचवण्यात आलंय.
मॉस्कोमध्ये या वर्षी २१ वर्षांच्या एका तरुणीला सेल्फीच्या नादात आपले प्राण गमवावे लागले. ती बंदुकीसोबत आपली सेल्फी काढत होती आणि चुकून बंदुकीतून गोळी सुटली... यातच तरुणीनं आपले प्राण गमावले. अनेकदा मुलं सेल्फी घेण्यासाठी रेल्वेवर चढतात आणि वीजेचा धक्का लागून आपला प्राण गमावतात. त्यामुळेच, या वेडापायी शेवटी सरकारला पुढाकार घ्यावा लागलाय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.