फुकट सेवा देणाऱ्या रिलायन्स जिओला २२.५ कोटींचं नुकसान

फुकटामध्ये सेवा देणाऱ्या मुकेश अंबानींच्या रिलायन्स जिओला मागच्या सहा महिन्यांमध्ये तब्बल २२.५ कोटींचं नुकसान झालं आहे. 

Updated: Apr 25, 2017, 07:23 PM IST
फुकट सेवा देणाऱ्या रिलायन्स जिओला २२.५ कोटींचं नुकसान  title=

मुंबई : फुकटामध्ये सेवा देणाऱ्या मुकेश अंबानींच्या रिलायन्स जिओला मागच्या सहा महिन्यांमध्ये तब्बल २२.५ कोटींचं नुकसान झालं आहे. ३१ मार्च २०१७ला संपलेल्या सहा महिन्यांची ही आकडेवारी आहे. मागच्या आर्थिक वर्षामध्ये हेच नुकसान ७.४६ कोटी रुपये एवढं होतं.

यंदाचं आर्थिक वर्ष हे रिलायन्स जिओसाठी महत्त्वाचं मानलं जात आहे कारण यावर्षापासून रिलायन्सनं जिओ ग्राहकांकडून सेवाशुल्क आकारायला सुरुवात केली आहे. १२ कोटी ग्राहकांपैकी जवळपास ७.२ कोटी ग्राहकांनी रिलायन्स जिओची प्राईम मेंबरशीप घेतली आहे. त्यामुळे या आर्थिक वर्षामध्ये जिओला नफा होईल, असा अंदाज वर्तवला जातो आहे.