मे महिन्यात जिओ करणार मोठा धमाका

रिलायन्स जिओ पुन्हा एकदा मोठा धमाका करण्याच्या तयारीत आहे. 

Updated: Apr 23, 2017, 05:52 PM IST
मे महिन्यात जिओ करणार मोठा धमाका title=

नवी दिल्ली : रिलायन्स जिओ पुन्हा एकदा मोठा धमाका करण्याच्या तयारीत आहे. 

मीडिया रिपोर्टनुसार, मुकेश अंबानी यांची कंपनी आता केबल टीव्ही दुनियेतही प्रवेश करण्याच्या तयारीत आहे. जिओकेअर डॉट नेटच्या रिपोर्टनुसार, लवकरच रिलायन्स जिओ डीटीएच सेवा सुरु करु शकते. 

दरम्यान, रिलायन्स जिओकडून अद्याप या बातमीला अधिकृत दुजोरा मिळालेला नाहीये. जिओची ब्रॉडबँड सर्व्हिस आणि डीटीएच सेवा दोन्ही एकाच वेळेस सुरु करण्याची शक्यताही वर्तवली जातेय.

कंपनीने स्मार्ट सेट अप बॉक्ससोबत जिओ ब्रॉडबँड कनेक्शन देण्याचा विचार करतेय.