अॅपलच्या आयफोन 5एसमध्ये घसघशीत सूट

आयफोन लव्हर्ससाठी ही खुशखबर आहे. अॅपल ने आपला स्मार्टफोन 5s च्या किंमतीत मोठी कपात केलीये. 16 जीबी पर्यायाच्या या आयफोनची किंमत 22 हजार 500 रुपये झालीये. 14 डिसेंबरपासून ही किंमत लागू करण्यात आलीये.

Updated: Jan 10, 2016, 02:03 PM IST
 अॅपलच्या आयफोन 5एसमध्ये घसघशीत सूट title=

नवी दिल्ली : आयफोन लव्हर्ससाठी ही खुशखबर आहे. अॅपल ने आपला स्मार्टफोन 5s च्या किंमतीत मोठी कपात केलीये. 16 जीबी पर्यायाच्या या आयफोनची किंमत 22 हजार 500 रुपये झालीये. 14 डिसेंबरपासून ही किंमत लागू करण्यात आलीये.

ई कॉमर्स वेबसाइट्सवर याहूनही कमी किंमतीत मिळत आहे. यापूर्वी सप्टेंबरमध्ये आयफोन ५एसच्या किंमतीत कपात करण्यात आली होती. त्यावेळी 16 जीबी पर्यायाच्या या आयफोनची किंमत 35 हजार रुपये होती.

2013 मध्ये अॅपलने हे ५एस व्हर्जन भारतात लाँच केले होते. त्यावेळी याची किंमत 53,500 रुपये होती.