नवी दिल्ली : मायक्रोसॉफ्टने भारतात नवा नोकिया २३० हा बजेट फोन लाँच केलाय. या फोनमध्ये इंटरनेटही वापरण्याची सुविधा देण्यात आली असून हा ड्युअल सिम आहे. कंपनीने या फोन तीन हजार ८६९ रुपये इतकी आहे.
मायक्रोसॉफ्टच्या अधिकृत दुकांनांमध्ये हा मोबाईल फोन विक्रीस ठेवण्यात आलाय. यात २.८ इंचाचा डिस्प्ले देण्यात आला आहे. यात दोन मेगापिक्सेल रेयर आणि दोन मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा देण्यात आलाय.
यात ३२ जीबीपर्यंत एक्सपांडेबल मेमरीची सुविधा देण्यात आलीय. तसेच १२००एमएएच बॅटरी कॅपॅसिटी आहे.