नववर्ष स्वागतासाठी गुगलचेही डूडल

आज २०१५या वर्षातील अखेरचा दिवस. नव्या वर्षाचे स्वागत करण्यास सर्वच सज्ज झाले आहेत. टेक्नॉलॉजी जायंट असलेल्या गुगलनेही नवनववर्ष स्वागतासाठी रंगीबेरंगी डूडल बनवलेय.

Updated: Dec 31, 2015, 09:08 AM IST
 नववर्ष स्वागतासाठी गुगलचेही डूडल title=

मुंबई : आज २०१५या वर्षातील अखेरचा दिवस. नव्या वर्षाचे स्वागत करण्यास सर्वच सज्ज झाले आहेत. टेक्नॉलॉजी जायंट असलेल्या गुगलनेही नवनववर्ष स्वागतासाठी रंगीबेरंगी डूडल बनवलेय.

गुगलच्या होमपेजवर रंगीबेरंगी पक्ष्यांचे डूडल दाखवण्यात आलेय. एका झाडाच्या फांदीवर पाच पक्षी बसले आहेत. या पक्ष्यांच्या मध्ये एक अंड ठेवण्यात आलं आहे. त्याला २०१६ असं नाव देण्यात आलं आहे. 

हे सर्व पक्षी ते अंड उबण्याची वाट बघताहेत. त्यापैकी एक पक्षी सतत घड्याळ बाहेर काढून वेळेकडे लक्ष ठेवत असल्याचे डूडलमध्ये दाखवण्यात आलंय.