नवी दिल्ली : जपानी कार कंपनी 'निस्सान'नं मारूती कंपनीला टक्कर देण्यासाठी 'निस्सान डॅटसन रेडी गो' ही छोटी कार बाजारात उतरवण्याचा निर्णय घेतला आहे.
निसानच्या या छोट्या कारची किंमत फक्त केवळ लाख रूपये असणार आहे. ही कार भारतात मारूती ऑल्टो आणि हुंडाईच्या कार्सला जोरदार टक्कर देईल असं दिसतंय.
निस्सान डॅटसनच्या या कारची निर्मिती भारतातच केली जाणार आहे. या कारला चेन्नईमधील रेनो-निस्सान मॅन्युफॅक्चरिंग प्लान्टमध्ये तयार करण्यात येणार आहे.
कंपनीनं दिलेल्या माहितीनुसार, भारतीय बाजारात येत्या १८ महिन्यांत ही कार उपलब्ध होईल. या कारची किंमत जवळपास अडीच लाख रूपये असेल. तसेच याच कारचं टॉप मॉडल जवळपास तीन लाखांत उपलब्ध होईल.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.