नवी दिल्ली : भर रस्त्यातून नो पार्किंगमधून गाडी उचलून नेण्याची घटना तुम्ही अनुभवली असेल अथवा पाहिली तर नक्कीच असेल... त्यावेळी गाडी दिसेनासी झाल्यावर गाडीच्या मालकाची होणारी धावपळ रोखण्यासाठी आता व्हॉट्सअॅपनं पुढाकार घेतलाय.
ट्राफीक पोलिसांनी रस्त्यातून गाडी टो करून करून नेली असल्यास त्या ठिकाणी खडूने गाडी कुठे नेली, याची माहिती लिहिली जाते. मात्र दिल्ली वाहतूक पोलिसांनी यावर उपाय काढला आहे. गाडी कुठे नेली याची माहिती पोलिसांच्या व्हॉट्सअॅपच्या ८७५०८७१४९३ या क्रमांकावर मेसेज करून मिळवता येणार आहे. तसेच, येण्यासाठी जवळ असलेल्या रस्त्याचीही माहिती देण्यात येणार आहे.
व्हॉट्सअॅप आजकाल अनेक मोबाईलवर दिसणारं अॅप्लिकेशन आहे. याच अॅपची लोकप्रियता लक्षात घेता त्यावरच ही माहिती उपलब्ध करून देण्याची शक्कल लढवलीय, अशी माहिती विभागाच्या विशेष पोलीस आयुक्तांनी दिली.
लोकांच्या तक्रारी आणि शंकांचं निरसन करण्यासाठीही पोलिसांची हेल्पलाईन सुरु आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.