मायक्रोमॅक्सचा कॅनव्हास ५ भारतात लॉन्च

मायक्रोमॅक्सने आज नवा कॅनव्हास 5 स्मार्टफोन भारतात लॉन्च केला. या फोनला बजेट स्मार्टफोन म्हटलं, तरी तो एवढाही स्वस्त नाही, दिवाळीच्या तोंडावर हा स्मार्टफोन लाँच करण्यात आला.

Updated: Nov 5, 2015, 11:16 PM IST
मायक्रोमॅक्सचा कॅनव्हास ५ भारतात लॉन्च title=

मुंबई : मायक्रोमॅक्सने आज नवा कॅनव्हास 5 स्मार्टफोन भारतात लॉन्च केला. या फोनला बजेट स्मार्टफोन म्हटलं, तरी तो एवढाही स्वस्त नाही, दिवाळीच्या तोंडावर हा स्मार्टफोन लाँच करण्यात आला.

कंपनीने मोबाइल प्रेमींसाठी आणखी एक ऑप्शन दिला आहे.  हा स्मार्टफोन 2013 साली लाँच करण्यात आलेला कॅनव्हास 4चं अपग्रेडेड व्हर्जन आहे. याची किंमत रु. ११ हजार ९९० रूपये आहे.

मायक्रोमॅक्स कॅनव्हॉस 5 चे खास फीचर
१) 3 जीबी रॅम आणि 16 जीबी इंटरनल स्टोरेज
२) 5.2 इंच डिस्प्ले
३) 1080×1920 रेझ्युलेशन पिक्सल, गोरिला ग्लास
४) 1.3 GHz मीडियाटेक MT6753 प्रोसेसर
५) 13 मेगापिक्सल ऑटोफोकस रिअर कॅमेरा, 5 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा
६) 4जी कनेक्टिव्हीटी
७) 2900 mAh बॅटरी क्षमता

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.