‘छोट्या पॅकेटस्’साठी छोटा टॅबलेट!

नवी दिल्ली स्थित कंपनी मेटिस लर्निंगनं चिप निर्माते ‘इन्टेल’सोबत हातमिळवणी केलीय... आणि शिक्षणासाठी उपयोगी ठरेल असा एज्युकेशनल टॅबलेट ‘एडी’ बाजारात उतरवण्याची तयारीदेखील... 

Updated: Sep 17, 2014, 08:10 AM IST
‘छोट्या पॅकेटस्’साठी छोटा टॅबलेट! title=

नवी दिल्ली : नवी दिल्ली स्थित कंपनी मेटिस लर्निंगनं चिप निर्माते ‘इन्टेल’सोबत हातमिळवणी केलीय... आणि शिक्षणासाठी उपयोगी ठरेल असा एज्युकेशनल टॅबलेट ‘एडी’ बाजारात उतरवण्याची तयारीदेखील... 

मुख्य म्हणजे, हा टॅबलेट असेल वयोवर्ष २ ते १० पर्यंतच्या मुलांसाठी... सुरुवातीला हा टॅबलेट विशिष्ट स्वरुपात ई-कॉमर्स कंपनी ‘अमेझॉन इंडिया’च्या वेबसाईवर उपलब्ध होईल. त्यानंतर तो प्रमुख इलेक्ट्रॉनिक्स स्टोअर्स आणि खेळण्यांच्या दुकानांतही उपलब्ध असेल.  

मेटिस लर्निंग सोल्युशनचे सह संस्थापक भरत गुलिया यांनी दिलेल्या माहितीनुसार, हाच लॅबलेट कंपनीनं ‘बीटा’ स्वरुपात सादर केला होता. त्याला ग्राहकांकडून उत्तम प्रतिसाद मिळाला. यात आता काही सुधारणा करून आणि इन्टेलसोबत हातमिळवणी करून बाजारात उतरवण्यात येतोय. 

कंपनीला आशा आहे की हा प्रयत्न नक्कीच यशस्वी होईल. कारण, लहान मुलांना हसत-खेळत शिकता येईल, असा काहीतरी पर्याय पालकांना हवा होता, असं गुलिया यांनी म्हटलंय. 

या टॅबलेटची किंमत असेल ९,९९९ रुपये... परंतु, सुरुवातील काही मर्यादित वेळेपर्यंत या टॅबलेटवर ४,५०० रुपयांची सूट मिळेल. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.