आता बीएड आणि एमएड होणार दोन वर्षाचे कोर्स

केंद्रीय मानव संसाधन विकास मंत्री स्मृती इराणींच्या शिक्षणावरून वाद निर्माण झाला असला, तरी त्यांच्या शिक्षणाबाबतची नीति अगदी स्पष्ट आहे. 

Updated: Sep 16, 2014, 01:07 PM IST
आता बीएड आणि एमएड होणार दोन वर्षाचे कोर्स title=

नवी दिल्ली: केंद्रीय मानव संसाधन विकास मंत्री स्मृती इराणींच्या शिक्षणावरून वाद निर्माण झाला असला, तरी त्यांच्या शिक्षणाबाबतची नीति अगदी स्पष्ट आहे. 

शिक्षकांच्या ट्रेनिंगसाठी सरकार रिफार्म मूडमध्ये आहे. याबाबतचं पहिलं पाऊल म्हणजे सरकार बीएड आणि एमएडचं स्वरूप बदलण्याचा विचार करतेय. सरकार या दोन्ही कोर्सचा अवधी वाढवून दोन वर्षांचा करणार आहे. स्मृती इराणी यांनी हा निर्णय 250हून अधिक केंद्र आणि राज्यातील विद्यापीठांच्या कुलगुरूंसोबत चर्चा केल्यानंतर घेतलाय. 

या बैठकीत सहभागी झालेल्या कुलगुरूंनी सांगितलं की, शिक्षकांना ट्रेनिंगचा अधिकार विद्यापीठला देणं आणि कोर्सचा अवधी वाढवून घेण्यासंदर्भात सर्वांचं एकमत झालं. 

नॅशनल काऊंसिल फॉर टीचर एज्युकेशन (एनसीटीई)च्या पूनम बत्रा कमेटीनं जुलैमध्येच सांगितलं होतं की, कोर्सचा अवधी वाढविण्याचं काम केलं जावं. केंद्रीय मंत्र्यांनी शिक्षकांच्या ट्रेनिंगला उच्च शिक्षणासोबत जोडण्याचं म्हटलंय. 

शिक्षकांशी निगडीत या निर्णयाला पंतप्रधानांनी शिक्षक दिनी केलेल्या भाषणाची जोड दिलीय. शिक्षकांच्या ट्रेनिंगमध्ये रिफॉर्म बद्दल 2012मध्ये जस्टिस वर्मा कमिशननं सुचवलं. शिक्षकांचं ट्रेनिंग इन्फर्मेशन आणि कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी (आयसीटी) अंतर्गत करण्याचं म्हटलंय.

पंतप्रधान मोदींनी शिक्षक दिवसाच्या भाषणात शिक्षकांना आयसीटी अंतर्गत ट्रेनिंग द्यावं, जेणेकरून ते विद्यार्थ्यांना अजून चांगल्या पद्धतीनं समजावू शकतील, असं म्हटलं होतं. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.