भरलेल्या पिस्तुलासह 'सेल्फी' काढायला गेला अन्...

आजकाल सेल्फीचं फॅड भलतंच वाढलंय... याच फॅडापायी का तरुणाला आपला जीव गमवावा लागलाय.

Updated: Aug 5, 2014, 03:11 PM IST
भरलेल्या पिस्तुलासह 'सेल्फी' काढायला गेला अन्...  title=
ऑस्कर एग्युलर

मॅक्सिको : आजकाल सेल्फीचं फॅड भलतंच वाढलंय... याच फॅडापायी का तरुणाला आपला जीव गमवावा लागलाय.

मॅक्सिकोच्या एका वेटनरी डॉक्टरसाठी सेल्फीचं फॅड जीवघेणं ठरलंय. 21 वर्षीय ऑस्कर ओटेरो एग्युलर याला सोशल नेटवर्किंग साईट ‘फेसबुक’वर आपले वेगवेगळे फोटो शेअर करण्याचं वेड होतं... मग, त्यासाठी तो धावत्या कारमध्ये उभा राहायचा किंवा एखाद्या महागड्या मोटारसायकलवर... ऑस्कर स्वत:चे सगळे फोटो फेसबुकवर शेअर करत होता. 

या फोटोंत तो सुंदर मुलींच्या गळ्याभोवती हात टाकून उभा राहिलेलाही दिसतो तसंच एखाद्या म्युझिक बँडसोबतही... तो आपल्या आयुष्यातले अनेक क्षण फोटोंच्या आणि फेसबुकच्या साहाय्यानं आपल्या मित्रांशी शेअर करत होता. पण, हीच सवय त्याला घातक ठरली. 

याच वेडाच्या भरात ऑस्करला पिस्तुलसोबत सेल्फी काढण्याची लहर आली... त्यानं आपल्या परिचयाच्या एका व्यक्तीकडे पिस्तुल मागितली... आणि बंदुक हातात पडल्याबरोबर तो सेल्फीसाठी पोझ देऊ लागला... आपला एक स्टायलिश फोटो त्याला हवा होता. 

पण, या गडबडीत दुर्घटना घडली. भरलेल्या बंदुकीची गोळी चुकून ऑस्करच्या हातातून सुटली. या घटनेत ऑस्करला गंभीर जखमी झालाय. ‘मी गोळीचा आवाज ऐकला... त्यानंतर कुणीतरी ओरडलेला आवाज आला. मला अंदाजा आला की कुणाला तरी गोळी लागलीय... मी लगेचच ही माहिती पोलिसांपर्यंत पोहचवली... पोलीस पोहचले तेव्हापर्यंत ऑस्कर जिवंत होता’ असं ऑस्करच्या एका शेजाऱ्यानं सांगितलंय. 

यानंतर ताबडतोब ऑस्करला हॉस्पीटलमध्ये हलवण्यात आलं... पण, डॉक्टरांनी उपचार करण्याआधीच त्याचा मृत्यू झाला होता. 
  

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.