www.24taas.com, झी मीडिया, न्यूयॉर्क
अमेरिकन अंतराळ संस्था नासानं मंगळावर पाठविलेल्या क्युरियॉसिटी रोव्हरनं गेले वर्षभर घेतलेल्या शोधानंतर मंगळावर पाण्याचे आणि जीवनाचे अवशेष आढळले नसल्याचं नासानं जाहीर केलंय. सायन्स र्जनलमध्ये ही माहिती प्रसिद्ध झाली आहे.
नासानं दिलेल्या माहितीनुसार क्युरियॉसिटी रोव्हर मिथेन वायूचा शोध घेत होता. मिथेन वायू सूक्ष्म जीवाणू असल्याचं द्योतक असतो. मिथेन न सापडणं म्हणजे जीवनाचा कोणताही पुरावा न मिळणं असं नाही. कारण पृथ्वीवर हजारो सूक्ष्मजीव असे आहेत की, ते मिथेन निर्माण करीत नाहीत.
मानवी इतिहासात आतापर्यंत मंगळावरील जीवनाच्या अनेक काल्पनिक कथा प्रसिद्ध झाल्या आहेत. पर्सीवल लोव्हेलनं मंगळावरील कालव्यावर कथानक गुंफले, तर ऑर्सन वेलेनं १९३८ साली वॉर ऑफ वर्ल्डस् ही भयकथा लिहिली. त्यामुळं मंगळाचं प्रत्येकालाच आकर्षण आहे. पण अद्याप मंगळावर जीवनाचे पुरावे मिळाले नसल्यानं अनेकांची निराशा झालीय.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.