सावधान! आलाय क्रेडिट, डेबिट कार्ड हॅक करणारा व्हायरस

भारतीय सायबर जगतात सध्या एका भयंकर व्हायरसनं एन्ट्री घेतलीय. हा व्हायरस तुमच्या क्रेडिट आणि डेबिट कार्ड संबंधित माहिती चोरतो.

Updated: Sep 4, 2014, 09:43 AM IST
सावधान! आलाय  क्रेडिट, डेबिट कार्ड हॅक करणारा व्हायरस  title=

दिल्ली : भारतीय सायबर जगतात सध्या एका भयंकर व्हायरसनं एन्ट्री घेतलीय. हा व्हायरस तुमच्या क्रेडिट आणि डेबिट कार्ड संबंधित माहिती चोरतो.

सायबर सुरक्षेशी निगडीत मुद्यांतून मार्ग काढण्यासाठी बनविल्या गेलेल्या नोडल एजन्सी ‘सीईआरटी-इन’नं देशातील इंटरनेट ग्राहकांच्या मदतीसाठी ही माहिती जाहीर केलीय. 

‘ट्रोजन’ प्रकारामधल्या या व्हायरसला ‘बॅकऑफ’ असं नाव दिलं गेलंय. विंडोज ऑपरेटिंग सिस्टम असणाऱ्या कम्प्युटर नेटवर्कमधून हा व्हायरस पसरतोय. बहुतांश वेळा, या व्हायरसला पॉईंट ऑफ सेल (पीओएस) बळी पडतो. 

एजन्सीनं दिलेल्या माहितीनुसार, हा व्हायरस इतका धोकादायक आहे की तो की-स्ट्रोकवरच ताबा मिळवतो आणि कमांडसोबत कम्युनिकेट करतो. तो सर्व्हरवरही ताबा मिळवतो.

सायबर सुरक्षा अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, बहुतेक वेळा व्हायरसविरोधी वेंडर या मालवेअर तसंच वेगवेगळ्या पद्धतीनं दाखल होणाऱ्या या व्हायरला ओळखू शकत नाहीत. ऑनलाईन जगतातील हा सर्वात मोठा आणि धोकादायक व्हायरस समजला जातो.  

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.