'लेनोवो ए-7000' लवकरच भारतातही होतोय दाखल!

लेनोवो इंडिया आपला नवीन स्मार्टफोन ए-7000 लवकरच लॉन्च करणार असं दिसतंय. 7 एप्रिल रोजी आयोजित एका कार्यक्रमासाठी कंपनीनं आमंत्रण धाडलीयत. 

Updated: Mar 27, 2015, 01:11 PM IST
'लेनोवो ए-7000' लवकरच भारतातही होतोय दाखल! title=

मुंबई : लेनोवो इंडिया आपला नवीन स्मार्टफोन ए-7000 लवकरच लॉन्च करणार असं दिसतंय. 7 एप्रिल रोजी आयोजित एका कार्यक्रमासाठी कंपनीनं आमंत्रण धाडलीयत. 

डॉल्वी अॅटमॉस टेक्नॉलॉजीवर आधारीत त्यांचा हा नवीन स्मार्टफोन असेल, असं म्हटलं जातंय. ही टेक्नॉलॉजी ए-7000 या स्मार्टफोनमध्ये बिल्ट-इन येते. 

4जी/ एलटीई बजेट लेनोवो स्मार्टफोन ए-6000 चं हे अपग्रेडेट व्हर्जन असेल. ए-7000 मध्ये मोठा डिस्प्ले आणि काही अपग्रेडेड स्पेसिफिकेशन्स आहेत. लेनोवो ए-7000 ड्युएल-सिमला (मायक्रो-सिम) सपोर्ट करतो. 

ए-7000 चे काही फिचर्स :

  • ऑपरेटिंग सिस्टम : अँन्ड्रॉईड 5.0 लॉलीपॉप

  • डिस्प्ले : 5.5 इंचाचा एचडी आयपीएस डिस्प्ले (720 X 1280) 

  • प्रोसेसर : 1.5 गीगाहर्टझ, क्लॉक्ड मीडियाटेक MT6572M

  • रॅम : 2 जीबी

  • कॅमेरा : 8 मेगापिक्सल, ऑटोफोकस आणि एईडी फ्लॅशसहीत

  • फ्रंट कॅमेरा : 5 मेगापिक्सल

  • इंटरनल स्टोअरेज : 8 जीबी(एक्सपान्डेबल)

  • इतर फिचर्स : 4G/LTE (FDD ब्रँड 1,3,7,20; TDD बैंड 40), वाय-फाय, जीपीएस/ए-जीपीएस, ब्लूटूथ, माइक्रो-यूएसबी कनेक्टिव्हिटी ऑप्शन्स

या फोनची किंमत 169 डॉलर (जवळपास 10,400 रुपयांपर्यंत) असू शकेल, अशी शक्यता आहे. लवकरच लेनोवोनं ज्या देशांत आपलं आपलं बस्तान बसवलंय अशा सर्व देशांमध्ये हा फोन उपलब्ध होईल.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.