नवी दिल्ली : टाटा मोटर्स अशी एक कार बाजारात आणणार आहे. ही कार जोरदार धूम माजवेल. ही कार ऑटोमेटीक गिअरची असेल. तसेच ही भारतातील स्वस्त कार असेल, असा दावा टाटा मोटर्सकडून करण्यात आलाय.
ही कार लहान असणार आहे. मात्र, नॅनोची ही सुधारीत आवृत्ती असणार आहे. नॅनो ट्विस्ट एएमटी असं या कारचे नाव असणार आहे. या कारच्या निर्मितीसाठी जोरदार तयारी सुरु आहे.
ही नवीन कार गुजरातमधील कारखान्यात तयार करण्यात येत आहे. या कारमध्ये जे नॅनोमध्ये इंजिन असेल तेच या कारमध्ये असणार आहे. म्हणजेच ६२४ सीसीचे एमपीएफआय हे इंजिन असेल. हे इंजित ३७ बीएचपीची शक्ती देईल.
टाटा कंपनी या कारचा रंग आणि रुप बदलणार आहेत. या कारची रचना वेगळी असणार आहे. या कारमध्ये फॉग लॅम्प बसविले जाणार आहेत. तसेच पाठी आणि पुढे बंपर असणार आहेत.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.