नवी मुंबई: लिनोव्होनं आपला बजेट 4G स्मार्टफोन A2010 लॉन्च केलाय. हा भारतातील आतापर्यंतच सर्वात स्वस्त 4जी स्मार्टफोन आहे. या स्मार्टफोनची किंमत अवघी ४,९९९ रुपये आहे.
लिनोव्हो A2010 एक्सक्लुझिव्हली ई-कॉमर्स वेबसाइट फ्लिपकार्टवर उपलब्ध असेल. स्मार्टफोनचा फ्लॅश सेल ३ सप्टेंबरपासून संध्याकाळी ३ वाजता सुरू होईल आणि यासाठी आज रजिस्ट्रेशन आपण करू शकता.
स्पेसिफिकेशनबाबत बोलणं झालं तर... लिनोव्हो A2010 स्मार्टफोन ४.५ इंचचा डिस्प्ले आहे. रिझॉल्यूशन
480x854 आहे. प्रोसेसर 1GHz MediaTek MT6735m 64-bit quad core आहे. सोबत १ जीबी रॅम दिलीय. स्मार्टफोनची इनबिल्ट स्टोरेज मेमरी ८ जीबी आहे. मायक्रोएसडी कार्डसह ३२ जीबी पर्यंत वाढेल. लिनोव्हो A2010मध्ये ५ मेगापिक्सेल रिअस कॅमेरा, फ्रंट कॅमेरा २ मेगापिक्सेल आहे.
A2010 एक ड्युअल सिम (GSM+GSM) स्मार्टफोन आहे, जो अँड्रॉइड 5.1 लॉलिपॉप ऑपरेटिंग सिस्टमवर चालेल. लिनोव्हो A2010मध्ये ब्लूटूश 4.0LE, वाय फाय, एफ एम रेडिओ आणि ४जी कनेक्टिव्हिटी फीचर आहे. हँडसेट 2000 mAhच्या रिप्लेसेबल बॅटरीसोबत उपलब्ध असेल.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.