VIDEO : ग्राहकानं घेतली बँकेच्या 'फेक कॉल'ची शाळा!

'हॅलो, सर मी तुमच्या XXX बँकेतून बोलत आहे. तुम्हाला तुमचं सध्याचं एटीएम कार्ड बदलून नवीन कार्ड देण्यात येतंय, त्यासंदर्भात तुम्हाला तुमच्या डेबिट कार्डची काही माहिती द्यावी लागेल' असं म्हणत डेबिट/क्रेडिट कार्ड धारकांना गंडा घालण्याचा नवा फंडा आता समोर येतोय. तुम्हालाही असा फोन आला तर सावधान!

Updated: Aug 20, 2015, 03:01 PM IST
VIDEO : ग्राहकानं घेतली बँकेच्या 'फेक कॉल'ची शाळा! title=

मुंबई : 'हॅलो, सर मी तुमच्या XXX बँकेतून बोलत आहे. तुम्हाला तुमचं सध्याचं एटीएम कार्ड बदलून नवीन कार्ड देण्यात येतंय, त्यासंदर्भात तुम्हाला तुमच्या डेबिट कार्डची काही माहिती द्यावी लागेल' असं म्हणत डेबिट/क्रेडिट कार्ड धारकांना गंडा घालण्याचा नवा फंडा आता समोर येतोय. तुम्हालाही असा फोन आला तर सावधान!

एका बँक ग्राहकालाही असाच अनुभव आलाय... अत्यंत गोड आवाजात बोलणाऱ्या आणि बँकेची प्रतिनिधी म्हणवून घेणाऱ्या महिलेनं या ग्राहकाला 'व्हेरिफिकेशन' करण्यासाठी म्हणून त्याच्या डेबिट कार्डचा नंबर विचारला. तेव्हा त्यानं त्या महिलेला आपली माहिती देण्यास नकार दिला... उलट या ग्राहकानं त्या महिलेचीच शाळा घेतली.

आपण बँकेच्या कोणत्या शाखेतून बोलत आहात? बँकेच्या शाखेचा पत्ता काय? बँकेचा आयएफएसीसी कोड काय? अशी काही माहिती विचारल्यावर 'बँक प्रतिनिधी' म्हणवून घेणाऱ्या महिलेची बोबडीच वळली... तिला उत्तरं देता येत नाहीत हे पाहून तिच्या एका साथीदारानं हा फोन घेऊन मग तो काही थातूर - मातूर उत्तरं देऊ लागला... पण, एव्हाना हा फेक कॉल असल्याचं निश्चित झालं होतं... 

तुम्हीच ऐका... कशी घेतली ग्राहकानं 'फेक कॉल'ची शाळा!

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.