इंटेक्सनं लॉन्च केला 3जी स्मार्टफोन, किंमत २९९९ रुपये!

स्मार्टफोन कंपन्यांमध्ये ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी स्पर्धाच लागलीय. या स्पर्धेत आता इंटेक्सही सहभागी झालाय. इंटेक्सनं अवघ्या २९९९ रुपयात स्वस्त ३जी स्मार्टफोन लॉन्च केलाय. 

Updated: Sep 14, 2014, 04:26 PM IST
 इंटेक्सनं लॉन्च केला 3जी स्मार्टफोन, किंमत २९९९ रुपये! title=

मुंबई: स्मार्टफोन कंपन्यांमध्ये ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी स्पर्धाच लागलीय. या स्पर्धेत आता इंटेक्सही सहभागी झालाय. इंटेक्सनं अवघ्या २९९९ रुपयात स्वस्त ३जी स्मार्टफोन लॉन्च केलाय. 

कंपनीनं बेसिक फोनच्या किमतीत ३जी स्मार्टफोन लॉन्च केलाय. या स्मार्टफोनचं इंटेक्स एक्वा ४एक्स नाव आहे. कंपनीनं खूप स्वस्त म्हणजे अवघ्या २९९९ रुपयांमध्ये स्मार्टफोन बाजारात आणलाय. 

इंटेक्सनं नुकताच सर्वात स्वस्त स्मार्टफोन इंटेक्स क्लाउड एफएक्स पण लॉन्च केलाय. याची किंमत १९९९ रुपये आहे. यानंतर कंपनीनं सर्वात स्वस्त ३जी स्मार्टफोन लॉन्च करून दुसरा धमाका केलाय. 

इंटेक्स 3जी स्मार्टफोन के फीचर्स

  • शानदार रिझॉल्यूशन असलेला 4 इंचचा डिस्प्ले स्क्रीन
  • दोन मेगापिक्सेल कॅमरा मागे आणि पुढे व्हीजिए कॅमेरा
  • दमदार परफॉर्मेंससाठी यात 1300 एमएएचची बॅटरी
  • इंटेक्स एक्वा 4एक्समध्ये गूगलची अँड्रॉईड 4.2.2 ऑपरेटिंग सिस्टम आहे
  • यात दोन सिमचा सपोर्ट
  • 3जी नेटवर्क
  • 512 एमपी रॅम आणि 256 एमपी इंटरनल मेमरी
  • एमपी3 प्लेयर
  • ब्लूटुथ
  • वाय-फाय
  • एफ एम रेडिओ
  • इंटरनेट ब्राउझर
  • एमएम अनेबल

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.