हेअर ब्रशने काढू शकता सेल्फी

स्वत:चा फोटो काढण्यासाठी आता दुसऱ्याची गरज भासणार नाही. तसेच तुम्हाला स्मार्टफोनचा आधार घ्यावा लागणार नाही. आता तुम्ही सेल्फी चक्क हेअर ब्रशने काढू शकता. त्यामुळे सेल्फी काढण्याचे ज्यांना प्रचंड वेड आहे. त्या तरूणपिढीला हेअर ब्रश मदत करणार आहे.

Updated: Sep 13, 2014, 08:07 PM IST
हेअर ब्रशने काढू शकता सेल्फी title=

मुंबई : स्वत:चा फोटो काढण्यासाठी आता दुसऱ्याची गरज भासणार नाही. तसेच तुम्हाला स्मार्टफोनचा आधार घ्यावा लागणार नाही. आता तुम्ही सेल्फी चक्क हेअर ब्रशने काढू शकता. त्यामुळे सेल्फी काढण्याचे ज्यांना प्रचंड वेड आहे. त्या तरूणपिढीला हेअर ब्रश मदत करणार आहे.

 ‘वेट’ या हेअर ब्रश कंपनीने तरुणाईला कॅश करून ‘सेल्फी ब्रश’ बनविला आहे. स्वतःचा सेल्फी काढून तो फेसबूकवर अपलोड करून त्याला आपल्या फ्रेंडसचे लाइक मिळवण्यात त्याचे अनेकांना समाधान असते. ज्या हेअर ब्रशने आपण केस विंचरायचे काम करतो, त्या ब्रशने आपण आपला फोटोदेखील काढू शकतो.

ही कल्पना फक्त स्वप्न न राहता, आता ती सत्यात उतरली आहे. या ब्रशमध्ये आयफोन घट्ट बसेल, अशी याची रचना केलेली आहे. या हेअर ब्रशमधून सहजरित्या फोटो काढतात येतात, बरं का?

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.