इंदोरच्या गौरव अग्रवालला 'गूगल'कडून १.७ करोडची ऑफर!

विविध कंपन्यांकडून मोठ्यात मोठे प्रस्ताव मिळवण्याच्या बाबतीत अग्रस्थानी असलेल्या आयआयटीच्या विद्यार्थ्यांना मागे टाकत, इंदोरच्या ‘इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी’च्या (आयआयटी.आय) २१ वर्षीय विद्यार्थ्यानं गूगलमध्ये गलेलठ्ठ पगाराची नोकरी मिळवलीय. 

Updated: Dec 16, 2014, 01:52 PM IST
इंदोरच्या गौरव अग्रवालला 'गूगल'कडून १.७ करोडची ऑफर! title=

इंदोर : विविध कंपन्यांकडून मोठ्यात मोठे प्रस्ताव मिळवण्याच्या बाबतीत अग्रस्थानी असलेल्या आयआयटीच्या विद्यार्थ्यांना मागे टाकत, इंदोरच्या ‘इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी’च्या (आयआयटी.आय) २१ वर्षीय विद्यार्थ्यानं गूगलमध्ये गलेलठ्ठ पगाराची नोकरी मिळवलीय. 

‘गूगल यूएसए’नं २१ वर्षीय गौरव अग्रवाल या विद्यार्थ्याला वार्षिक १.७ करोड रुपये पॅकेजची ऑफर दिलीय.

‘आयआयटी-आय’च्या एका प्रवक्त्यानं दिलेल्या माहितीनुसार, ‘आयआयटी.आय’च्या (कम्प्युटर सायन्स अँन्ड इंजिनिअरिंग) शेवटच्या वर्षातील विद्यार्थी असलेल्या गौरवला गूगलनं ही आकर्षक ऑफर दिलीय. गूगल यूएसएकडून गौरवला दिली गेलेली ही ऑफर आत्तापर्यंत विविध ‘आयआयटी’ संस्थांमध्ये विद्यार्थ्यांना कॅम्पस प्लेसमेंटदरम्यान मिळालेल्या गलेलठ्ठ पगाराच्या प्रस्तावांमध्ये सर्वांत जास्त आहे. 

छत्तीसगडच्या भिलाई कुटुंबातला गौरव अग्रवाल गूगलच्या या प्रस्तावामुळे खूपच खूश आहे. २०१५ साली आयआयटी-आयमध्ये शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्याच वर्षी आपल्याला गूगलच्या कॅलिफोर्निया स्थित ऑफिस जॉईन करावं लागेल. कामावर रुजू होण्यासाठी अजून विशिष्ट तारीख दिली गेलेली नाही, असंही गौरवनं स्पष्ट केलंय. 

‘गूगल’मध्ये सहभागी होण्यासाठी गौरवनं ‘आयआयटी-आय’ची ऑनलाईन टेस्ट दिली होती. ही परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर गूगलनं त्याला आपल्या गुडगाव स्थित ऑफिसमध्ये इंटरव्ह्यूसाठी बोलावलं होतं... आणि यामध्ये तो यशस्वी ठरला.

‘आयआयटी-आय’ची ओळख देशातील चांगल्या इन्स्टिट्यूटमध्ये होतेय. आयआयटी-आयमध्ये २००९ सालापासून शिक्षणाची संधी उपलब्ध झालीय.  

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.