मुंबई : तुम्हाला माहित आहे का की पंतप्रधान नरेंद्र मोदींना संपर्क कसा करायचा ? अनेकांना पंतप्रधान मोदींपर्यंत अनेक गोष्टी पोहोचवायच्या असतात. अनेकांना सरकारी बँकेमध्ये ट्रान्सफर नाही मिळत आहे, अनेकांकडे नातेवाईकांच्या उपचारासाठी पैसे नव्हते. अशा वेगवेगळ्या समस्यांवर पंतप्रधान मोदींकडे मदत मागितल्यावर अनेकांना मदत मिळाली आहे.
सरकारच्या योजनांवर काही सल्ला, काही आयडिया किंवा प्रतिक्रिया तुम्ही पंतप्रधान मोदींपर्यंत पोहोचवू शकता.
कसा कराल पंतप्रधान मोदींना संपर्क
तुम्ही खालील वेबसाईटवर जाऊन पंतप्रधान मोदींशी संपर्क करु शकतात.
http://pgportal.gov.in/pmocitizen/GrievancepmoHI.aspx
या वेबसाईटवर तुम्ही काही आयडिया किंवा तुमच्या तक्रारी पंतप्रधान मोदींपर्यंत पोहोचवू शकतात. जर तुम्हाला सरकारी कार्यक्रम, योजना यामध्ये तुमच्या काही आयडियाच्या माध्यमातून सहभागी व्हायचं असेल तर तुम्ही "मेरी सरकार (माय गॉव) या वेबसाइटवर जाऊन संपर्क करु शकता.
सोशल मीडियाच्या माध्यमातून देखील तुम्ही पंतप्रधान मोदींशी संपर्क करु शकता.
पंतप्रधान कार्यालयाचं ट्विटर अकाऊंट - https://twitter.com/PMOIndia
पंतप्रधान नरेंद्र मोदींचं ट्विटर अकाऊंट - https://twitter.com/narendramodi
पंतप्रधान नरेंद्र मोदींचं फेसबूक पेज - http://facebook.com/narendramodi.official
पंतप्रधान नरेंद्र मोदींची वेबसाईट - http://www.narendramodi.in/
पंतप्रधान नरेंद्र मोदींचं मोबाईल अॅप - अँड्राइड डाऊनलोड लिंक, आयफोन डाऊनलोड लिंक